दिल्ली-एनसीआरमध्ये 5.7 तीव्रतेचा भूकंप

नवी दिल्ली,अफगाणिस्तानसह दिल्ली-एनसीआरमध्ये आज, गुरुवारी सकाळी 11.26 वाजता भूकंप झाला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 5.7 इतकी मोजण्यात आली. यात कुठल्याही जीवित किंवा वित्तहानीची नोंद झालेली नाही.
अफगाणिस्तानमध्ये सुमारे 2 आठवड्यांपूर्वी देखील भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.8 इतकी मोजली गेली होती. यामध्ये कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. पृथ्वी हादरल्याबरोबर लोक घराबाहेर पडू लागले. अफगाणिस्तान भूकंपाच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहे. त्यानंतर आज, गुरुवारी 29 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे बसले आहेत.
What's Your Reaction?






