केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज, बुधवारी हा निर्णय झाला. महागाई भत्त्यातील(डीए) वाढ सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत असेल. यामुळे कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 53 टक्केडीए मिळेल.केंद्रीयमंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा फायदा 68लाखांहून अधिक कर्मचारी आणि सुमारे 42 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. वाढीव पगार, पेन्शनसोबतच कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 3 महिन्यांची थकबाकीही मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखी गोड होणार आहे.कर्मचाऱ्यांसोबतच निवृत्तीवेतनधारकांनाही सरकारने महागाई भत्त्यात केलेल्या वाढीचा फायदा होणार आहे. वास्तविक, पेन्शनधारकांना सरकारकडूनमहागाई सवलत देण्यात येते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow