जम्मू-काश्मीर : बारामुला येथे 3 दहशतवादी ठार

श्रीनगर:जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले आहेत. जिल्ह्यातील चक टप्पर क्रिरी भागात ही चकमक झाल्याचे सैन्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
या परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपून बसले आहेत. मारले गेलेले दहशतवादी आणि त्यांच्या गटाची ओळख पटवली जात आहे. जम्मू-काश्मीरमधील तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात बारामुल्ला, कुपवाडा आणि बांदीपोरा जिल्ह्यात 1 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. दरम्यान, जम्मू विभागातील किश्तवाड जिल्ह्यातील चत्रू गावात अजूनही दहशतवादविरोधी कारवाई सुरू आहे, जिथे शुक्रवारी दहशतवाद्यांच्या एका गटाशी झालेल्या चकमकीत लष्कराचे 2 जवान हुतात्मा झाले आणि 2 जण जखमी झाले आहे.
जम्मू विभागातील पुंछ, राजौरी, डोडा, कठुआ, रियासी आणि उधमपूर या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये 2 महिन्यांहून अधिक काळ लष्कर, सुरक्षा दल आणि नागरिकांवर दहशतवादी हल्ले होत आहेत. दहशतवादी अचानक हल्ला करतात आणि नंतर डोंगराळ भागातील जंगलात गायब होतात या हल्ल्यांना परदेशी दहशतवाद्यांचा एक गट जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. या दहशतवाद्यांची संख्या 40 ते 50 आहे. या अहवालानंतर, लष्कराने त्या जिल्ह्यांच्या घनदाट जंगलात 4 हजारांहून अधिक प्रशिक्षित सैनिक तैनात केले आहेत, ज्यात विशेष पॅरा कमांडो आणि पर्वतीय युद्धात प्रशिक्षित सैनिकांचा समावेश आहे.राज्यात पहिल्या टप्प्यात 18 सप्टेंबर रोजी चिनाब खोऱ्यातील डोडा, किश्तवार आणि रामबन जिल्ह्यांतील आठ विधानसभा जागांसाठी तसेच दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग, पुलवामा, शोपियान आणि कुलगाम जिल्ह्यांतील 16 जागांसाठी मतदान होणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात जम्मू, कठुआ आणि सांबा जिल्ह्यात अनुक्रमे 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला मतदान होणार आहे.
What's Your Reaction?






