मुंबई : चळवळीला जर सत्त्वगुणांची जोड मिळाली, तर तिचे रूप पालटते. सध्याच्या काळात चळवळ उभी करणे तितके कठीण नाही. त्यासाठी अनुयायी मिळतात,पण ती चळवळ कार्यान्वित झाल्यावर सर्व सूत्रे योग्य व्यक्तीच्या हातात असणे महत्त्वाचे असते. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी पुढे सरसावलेले संवेदनशील अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी एक एक पाऊल पुढे टाकत सुरु केलेल्या ‘नाम’ फाउंडेशन संस्थेने आपल्या अनेक विधायक कामातून यशस्वी ९ वर्ष पूर्ण केली. १० व्या वर्षात पदार्पण करीत असताना या सर्व कामांचा आढावा घेत संस्थेचा १० वा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला. या वर्धापन दिनाला महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वर्धापन दिनाची सुरुवात डॉ. गणेश चंदनशिवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या ‘गण’ आणि ‘गोंधळा’ ने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले त्यानंतर उदय सामंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. नाम संस्थेचे विश्वस्त आणि सीएसआर (CSR) च्या माध्यमातून मदत करणाऱ्या प्रतिनिधींचा यावेळी कृतज्ञता पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर पाटील आदि मान्यवर मंडळी उपस्थित होती. सिर्फ 'नाम' ही काफी हे असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी ‘नाम’ फाउंडेशन संस्थेच्या कार्याचे कौतुक यावेळी केले. नेतृत्व सक्षम असेल तर समाजाच्या माध्यमातून परिवर्तन घडवता येते, हे ' नाम’ ने दाखवून दिल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं. आपल्या ग्लॅमरचा योग्य तो उपयोग करून जनतेमध्ये विश्वास निर्माण करत लोकचळवळ उभारण्याचं काम नाना आणि मकरंद या दोन अवलियानी केलं. या चळवळीने आज वेगवेगळ्या रूपाच्या कामाने समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. दुःख आत्मसात करून जगण्याची प्रेरणा निर्माण करण्याचं काम आणि आत्मविश्वास 'नाम' ने आपल्या कामातून निर्माण केला आहे. विधायक कामाचा वसा अव्याहत सुरु राहावा यासाठी शासन म्हणून कायम कटिबद्ध राहत सर्वोतपरी मदत करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्र राज्यात ‘नाम’ संस्थने जलसंधारणाच्या क्षेत्रात खूप उत्तम काम केलं आहे. त्यांचं हे काम आता राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. नानांनी दिल्लीला येणं गरजेचं असून सर्व ते सहकार्य करण्याची तयारी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर.पाटील यांनी दाखवत नानांच्या कामाचं कौतुक केलं. यावेळी २५ लाखाचा निधी त्यांनी ‘नाम’ संस्थेला दिला. याप्रसंगी बोलताना उदय सामंत म्हणले की, सामाजिक काम करणारे कलाकार म्हणून मला नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मंत्रिमंडळातील सर्व खाती चालवून विकास करण्याचं प्रामाणिक कामं करणारी ‘नाम फाउंडेशन' संस्था आम्हा प्रत्येकासाठी आदर्श आहे. ‘नाम’ फाउंडेशन संस्थेच्या वर्धापनदिनाला उपस्थित राहिल्याने माझ्या सामाजिक आणि राजकीय कार्याला नवी ऊर्जा मिळू शकते; या विश्वासाने मी आज इकडे उपस्थित असल्याचे प्रतिपादन उदय सामंत यांनी केले. मार्केटिंग न करता विधायक काम करता येते हे ‘नाम’ फाउंडेशन संस्थेने दाखवून दिले आहे. माझ्या राजकीय वाटचालीत ही गोष्ट शिकण्यासारखी असल्याचे मला वाटते. व्हिजिलन्स म्हणून नाना ज्याप्रकारे काम करतात ते खरचं कौतुकास्पद आहे. मी नामाचा सदस्य आहे हे तुम्ही समजून घ्यावं. ९ व्या वर्धापनदिनाप्रमाणे नामाचा ९० वा वर्धापनदिन ही साजरा व्हावा अशा शुभेच्छा उदय सामंत यांनी यावेळी दिल्या. आम्ही हा जो वसा घेतला आहे त्यासाठी सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचा मी ऋणी असल्याचे अभिनेते नाना पाटेकर यांनी सांगितले. हे न संपणार कार्य असून सगळ्यांना बरॊबर घेऊन हा वसा सुरु ठेवण्याची जबादारी नव्या पिढीच्या नेतृत्वाने सक्षमपणे सांभाळावी. यासाठी आमचे आशीर्वाद कायम सोबत असतील असा विश्वास ही नानांनी यावेळी नामला सहकार्य करणाऱ्या सगळ्या मंडळींना दिला. *नाम संस्थेविषयी* गेल्या ९ वर्षात ‘नाम’ ही संस्था १,००,८०,००० इतक्या कुटुंबांची काळजीवाहू संस्था बनली आहे आणि हासमाजसेवेचा वसा असाच अविरत ठेवणार आहे. यात आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांचाशैक्षणिक खर्च ‘नाम फाउंडेशन’ आजही अखंडितपणे करत आहे. शिवाय घरचा कर्ता पुरुष गेल्याने जी आर्थिक कुचुंबणाहोत आहे ती काही अंशी कमी होण्यासाठी कुटुंबातील एकल महिलांना पूर्वी रु. १५,००० इतके आर्थिक सहाय्य केले जायचे. परंतु या रकमेत वाढ करून रु. २५,००० करण्यात आली आहे. त्यामुळे या कुटुंबांना आधार मिळत आहे अशा कुटुंबातील मुलेशिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून त्यांना सुसज्ज असे वसतिगृह बांधून शिक्षणाचीहोणारी फरफट थांबवली आहे. शिवाय गावांगावांतील बचत गटातील महिलांना डाळ मिल,पिठाची गिरणी, शिलाई मशीन अशा सुविधा पुरवून त्यांची आर्थिक बाजू स्थिर होण्यासाठीसंस्था गेली ९ वर्ष कार्य करीत आहे. १० व्या वर्षात पदार्पण करीत असताना आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदतकरण्यापासून सुरुवात झालेली ही चळवळ जलसंधारण, महिला सक्षमीकरण, शैक्षणिक उपक्रम,आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा अशा विविध उपक्रमांद्वारे राज्यातील प्रत्येककुटुंबांपर्यंत पोहोचत आहे. समाजकार्याचा हा वसा संस्थेच्या माध्यमातून देशातीलजम्मू काश्मीर, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, लेह लडाख, राजस्थान, छत्तीसगड,झारखंड इत्यादी विविध राज्यातील संकटांनी प्रभावित झालेल्या कुटुंबांपर्यंतआधाराचा हात बनवून पोचली आहे. भविष्यातही ‘नाम फाउंडेशन’ ही संस्था अखंडपणे उभी राहील यात शंका नाही
नाम' ने समाजाच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्याचं केलेलं काम कौतुकास्पद : फडणवीस
नवरात्रोत्सवानिमित्त मुंबई पोलीसांकडून 'निर्भया पथ...
मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी त्यांच्या निर्भया पथकातील शूर आणि समर्पित महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान केला. ...
भायंदर : अन्न विषबाधेची भीषण घटना — ३ वर्षांच्या म...
भायंदर : भायंदर पश्चिम येथे अन्नातून विषबाधा झाल्याची एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी रात्री झालेल्या या घटनेत केवळ ३ वर्षां...
मीरा-भाईंदरमध्ये डेंग्यूचा कहर, १० जणांचा संशयित म...
मीरा-भाईंदर:मीरा-भाईंदर शहरात पावसामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्याने आरोग्य धोक्यात आ...
गणेशोत्सव २०२५ : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक...
मुंबई – गणेशोत्सव २०२५ च्या आठव्या दिवशी, मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपतीपैकी एक असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजारो भक्तांनी लाल...
शिरगाव किल्ल्यावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेअंतर्ग...
शिरगाव : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि स्वच्छता महाश्रमदान मोहिमेच्या निमित्ताने दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी शिरगाव येथे शिरगाव किल्ला ...
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; एकाच दिवशी ७८,०...
वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने ११ सप्टेंबर २०२५ रोजी व्यापक कारवाई करत तब्बल ७८,०४...
वसई-विरारमध्ये बेकायदेशीर बांधकामावर कारवाई; सहाय्...
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ :वसई-विरार शहर महानगरपालिका VVCMC ने बेकायदेशीर बांधकामावर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, याचाच भाग म्ह...
वसई रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म ६ व ७ ची दक्षिण बाज...
वसई, २९ ऑगस्ट : पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे की, वसई रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ ...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद नाकारले; मुख्यमंत्रिपदावर ठाम
मुंबई - महाराष्ट्र राज्यातील निवडणुकांनंतर महायुतीला ऐतिहासिक यश मिळाल...
बृहन्मुंबई महानगरपालिका: कबुतरखान्यांतील खाद्य पुरवठा नियंत्रित पद्धतीने करण्याबाबत नागरिकांना आवाहन
मुंबई, १७ ऑगस्ट २०२५: बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबईतील कबुत...
माझे घर, माझा गणपती’ उपक्रमांतर्गत ठाणे महापालिकेची शाडू मूर्ती कार्यशाळा; नागरिक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ठाणे, ३० जुलै: ठाणे महानगरपालिका आणि प...
दुकानदाराला मारहाण : संतप्त व्यापाऱ्यांचा बंद; मीरा-भाईंदर शहरात स्वयंस्फूर्तीने बंदची हाक
मीरा रोड, ३ जुल...
Stay Connected
शिरगाव किल्ल्यावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेअंतर्गत भव्य स्वच्छता अभियान राबवले
शिरगाव : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि स्वच्छता महाश्रमदान मोहिमेच्या निमित्ताने दिनां...
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; एकाच दिवशी ७८,०४६ चौ. फूट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त
वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने १...
वसई-विरारमध्ये बेकायदेशीर बांधकामावर कारवाई; सहाय्यक आयुक्त गणेश पाटील निलंबित
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ :वसई-विरार शहर महानगरपालिका VVCMC ने बेकायदेशीर बांधकामावर कठ...
Previous
Article