पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन

पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुण्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले. २६ सप्टेंबर रोजी निश्चित झालेला मोदींचा पुणे दौरा पावसामुळे रद्द झाला होता. आज दुपारी पंतप्रधान मोदी ऑनलाईन उपस्थितीत राहून प्रतीक्षेत असलेला जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या मार्गाचे लोकार्पण केले. सकाळी 11 वाजता गणेश क्रीडा मंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. ज्याला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थितीत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमधून केली. पुण्यातील माझ्या सर्व लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना माझा नमस्कार, असं म्हणत त्यांनी संवादाला सुरुवात केली.पावसामुळं मला कार्यक्रम रद्द करावे लागले यात माझं नुकसान आहे. ज्या शहराला देशात एक वेगळं महत्त्व आहे तिथे मला येता आलं नाही. स्वारगेट मार्गावर मेट्रो धावायला लागेल. सावित्रीबाई यांचे स्मारक याचे सुद्धा आज भूमिपूजन करण्यात आलं. विठ्ठलाच्या आशीर्वादाने त्यांच्या भक्तांना फळ मिळालं आहे, कारण सोलापूर विमानतळ कार्यरत होत आहे. पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी आता लोकं थेट सोलापूरला विमानाने जाऊ शकतात, असं मोदी म्हणाले. महाराष्ट्र राज्याला नवीन लक्ष्य ठेवण्याची गरज आहे.आज पुणे ज्या वेगाने वाढते आहे त्यात पुण्याची लोकसंख्या वाढतेय. या लोकसंख्याच सामर्थ्य वाढवण्याची गरज आहे. महायुतीची सरकार हाच विचार घेऊन दिवस रात्र काम करत आहे. पुण्याची आधुनिकता पाहता आधीपासूनच काम करायची गरज होती. मेट्रो आधीच यायला हवी होती पण दुर्दैवी आहे की शहरात प्लॅनिंग आणि व्हिजन या गोष्टीचा आभाव राहिला, असं ते म्हणाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow