भाईंदर महानगर पालिकेसमोर जन आक्रोश मोर्चा, गावाचे गावपण वाचवण्यासाठी आंदोलन
भाईंदर:भाईंदर पूर्वेच्या खारेगाव येथील काही स्थानिक नागरिकांनी गावाचे गावपण वाचवण्यासाठी मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जन आक्रोश मोर्चा काढला. धन्वंतरी महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ. प्रीती पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी "हक्काचे घर द्या" आणि "घर द्या" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. राहिवाशांचे म्हणणे आहे की, गावठाण क्लस्टर योजनेत त्यांना संकुचित करून त्यांची घरे धोक्यात आणू नयेत. त्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले आणि १५ दिवसांच्या आत योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, जर समाधानकारक उत्तर मिळाले नाही, तर गावाचे गावपण वाचवण्यासाठी उपोषणाचा इशारा डॉ. प्रीती पाटील यांनी दिला
What's Your Reaction?






