भाईंदर : स्कुटीवर स्टंटबाजी करणं पडलं महागात ! वाहतूक पोलिसांची कारवाई

भाईंदर : स्कुटीवर स्टंटबाजी करणं पडलं महागात ! वाहतूक पोलिसांची कारवाई

भाईदर :-  मिरारोड पूर्व परिसरात सार्वजनिक रस्त्यावर हेलमेट न घातला स्कुटीचे हॅंडल पकडून उलटे बसून स्कुटी चालवून स्टंट करणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर पोलिसांच्या मार्फत कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात एक व्यक्ती हेलमेट न घातला स्कुटीवर उलटे बसून स्कुटी चालवताना दिसत होता. वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करत केलेली स्टंटबाजी महागात पडली असून या व्यक्तीला कारवाईला सामोरे जावे लागले आहे. 

वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार, वाहतूक पोलिसांनी "ई -चलन" मशिनद्वारे स्टंट करणाऱ्या व्यक्तीचे नाव व मोबाईल नंबर याचा शोध घेत ही कारवाई करण्यात आली. या व्यक्तीचे नाव इब्राहिम शेख असून त्याने केलेल्या स्टंट विषयी कबुली दिली आहे. त्यानंतर पोलिसानी वाहतूक कायद्याचे उल्लंघन करून स्टंट केल्या प्रकरणी त्याच्यावर नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करत कारवाई केली आहे. कलम २८१, १२९, १८४ नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow