मालवण घटनेच्या निषेधार्थ नाशकात मनसेचे आंदोलन

नाशिक,छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्ग येथील पुतळा ८ महिन्यात कोसळला या घटनेचा निषेध म्हणून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पाथर्डी फाटा येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने निषेध आंदोलन केले करण्यात आले. शासनाने घेतलेल्या भूमिकेबाबत देखील तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी उपस्थित मनसे प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार,शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके ,नामदेव पाटील, महिला प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे,उपशहराध्यक्ष सचिन सिन्हा, सरचिटणीस मिलिंद कांबळे अन्य मनसैनिक उपस्थित होते.
What's Your Reaction?






