मीरा रोडमध्ये पतीच्या क्रूरतेचा बळी, पत्नीची गळा चिरून हत्या!
मीरा रोड: मीरा रोडच्या नयानगर परिसरात गुरुवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे नदीम खान नावाच्या व्यक्तीने आपल्या पत्नी अमरीनची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली आहे. ही घटना एन.एच. शाळेजवळ दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान घडली.माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये गेले काही दिवस सतत वाद होत होते. अमरीनने यापूर्वी नयानगर पोलिसांकडे आपल्या जीवाची सुरक्षा मागितली होती, पण तिची मागणी दुर्लक्षित करण्यात आली. घटनेच्या दिवशी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि संतापाच्या भरात नदीमने चाकूने अमरीनचा गळा चिरला. या क्रूर हल्ल्यात अमरीनचा जागीच मृत्यू झाला. घटना घडताच स्थानिक नागरिकांनी आरोपी नदीमला ताब्यात घेतले आणि त्वरित नयानगर पोलिसांच्या ताब्यात दिले. या क्रूर घटनेने परिसरात खळबळ उडाली असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अमरीनला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले नयानगर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सुरू असून पोलिस आरोपीची चौकशी करत आहेत.या घटनेने समाजात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.पती-पत्नीमधील तणावाने एका महिलेचा बळी घेतला आहे. योग्य वेळी हस्तक्षेप केला असता तर अमरीनचा जीव वाचला असता का? पोलिसांच्या दुर्लक्षामुळे एका निष्पाप महिलेचा बळी गेला असून समाजात चर्चा सुरू आहे.
What's Your Reaction?






