मेळघाटात भीषण अपघात; खाजगी बस पुलाखाली कोसळली, 30 ते 40 प्रवासी जखमी

अमरावती : मेळघाटमधील वळण रस्त्यावर खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे.अमरावती जिल्ह्यातील परतवाडा धारणी मार्गावर सेमाडोह जवळ खाजगी बसचा अपघात झाला आहे.
आज सकाळी 8 वाजता हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.मेळघाटमधील वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस लगतच्या पुलाखाली कोसळली.या अपघातात 30 ते 40 प्रवासी जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहेसर्व जखमी प्रवाशांवर लगतच्या सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहे.
What's Your Reaction?






