मुंबई:लॉरियल पॅरिस या जगातील पहिल्या क्रमांकाच्या ब्युटी ब्रँडने आलिया भट यांची जागतिक ब्रँड अ‍ॅम्बेसिडरपदी नियुक्ती जाहीर केली आहे. यामुळे आलिया यांचा व्हायोला डेव्हिस, जेन फोंडा, इवा लॉन्गोरिया, केंडल जेनर, एले फॅनिंग, कॅमिला कॅबेलो या व अशा प्रवक्त्यांमध्ये समावेश झाला आहे. पुरस्कार विजेती अभिनेत्री, निर्माती आणि उद्योजक असलेल्या आलिया या फ्रेंच ब्युटी ब्रँडच्या सप्टेंबर २०२४ पासून सुरू होत असलेल्या कॅम्पेनमध्ये दिसतील. टाइम मासिकाने जाहीर केलेल्या २०२४ मधील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक असलेल्या आलिया यांनी विविध भाषा आणि प्रकारच्या सिनेमांत काम करत अनेक मान-सन्मान आणि समीक्षकांचे कौतुक मिळवले आहे. खऱ्या अर्थाने बहुगुणी असलेल्या आलिया यांचे व्यक्तिमत्त्व लॉरियल पॅरिसच्या मूल्यांशी सुसंगत असून त्याही सर्वसमावेशकता, सक्षमता, जगभरातील इतर स्त्रियांबरोबर आत्मविश्वासाची ताकद शेअर करणाऱ्या आहेत.

‘भारतीय अभिनेत्री आलिया भट यांचे परिवारात स्वागत करताना लॉरियल पॅरिसला आनंद होत आहे. आलिया यांनी जागतिक व्यासपीठाच्या मदतीने कशाप्रकारे सिनेमा क्षेत्रात सर्वसमावेशकता आणली आणि भारतीय सिनेमाला जगभरात पोहोचवले हे कौतुकास्पद आहे. पृथ्वी आणि इथल्या लोकांप्रती वाटणारा त्यांन वाटणारा जिव्हाळा लक्षात घेता त्या स्त्री गुणवत्ता, उद्योजकता आणि स्त्रियांना नव्या उंचीवर नेण्यासाठी लॉरियल पॅरिस देत असलेल्या संधींचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी सर्वात योग्य अ‍ॅम्बेसिडर आहेत,’ असे लॉरियल पॅरिसच्या जागतिक अध्यक्ष डेल्फीन विगुएर-होवास म्हणाल्या. ‘लॉरियल पॅरिस कुटुंबात सहभागी होत कणखर, सामर्थ्यशाली स्त्रियांसह उभं राहाताना मला आनंद होत आहे. त्वचेशी संबंधित सर्व गोष्टींमध्ये रस असणारी व्यक्ती या नात्याने मला लॉरियल पॅरिसची नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सौंदर्य क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेली गुणवत्ता उल्लेखनीय वाटते. स्त्रीच्या सक्षमतेला चालना देण्याचे ब्रँडचे प्रयत्न मला जवळचे वाटतात, कारण त्यामुळे प्रत्येक स्त्रीला आपल्या ताकदीची नव्याने जाणीव होते. लॉरियल पॅरिससह सौंदर्य क्षेत्रात सकारात्मक परिणाम घडवून आणण्यासाठी आणि स्त्रियांना सर्वसमावेशकतेचा अनुभव देण्यासाठी मी उत्सुक आहे,’ असे आलिया भट म्हणाल्या.

आलिया भट यांच्याविषयी : विविध भूमिकांचे यशस्वी सादरीकरण करत आलिया भट यांनी समीक्षकांचे कौतुक आणि बॉक्स ऑफिस कमाईचा दुर्मील समतोल साधला आहे. गेल्या केवळ तीनच वर्षांत त्यांच्या प्रत्येक सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील पहिल्या दहा सिनेमांत स्थान मिळवले आहे. वास्तविक आणि अभिजात गोष्टींना वाव देणारी त्यांची निर्मिती संस्था – इटर्नल सनशाइन प्रॉडक्शन्स २०१९ मध्ये लाँच करण्यात आली होती. निर्माती या नात्याने त्या दमदार कथांच्या मदतीने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे तसेच त्यांच्या भावनांना साद घालण्याचे त्यांचे ध्येय आहे. हे करताना त्यांना मनोरंजन क्षेत्रात स्त्रियांना समान वाव मिळावा म्हणून त्या प्रयत्नशील असतात. नेटफ्लिक्सवरील त्यांचा पहिला सिनेमा ‘डार्लिंग्ज’ केवळ दोन आठवड्यांत नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिला गेलेला इंग्रजीइतर कंटेंट ठरला होता. त्यानंतर एमी विजेते दिग्दर्शक रिची मेहता आणि क्यूसी, रिची मेहता व आलिया भट यांची निर्मिती असलेली त्यांची अमेझॉन प्राइम व्हिडिओ सीरीज पोचरही लोकप्रिय झाली. लाखमोलाचं स्त्रीत्व आलिया भट यांचा टाइम मासिकाच्या २०२४ मधील सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश करण्यात आला होता. त्यांचा फोर्ब्जच्या ३० अंडर ३० तसेच भारतीय व्यवसायातील सर्वात सामर्थ्यशाली ५० स्त्रियांच्या यादीतही समावेश झाला होता. भारतातील सर्वात आघाडीवर असलेल्या पाच इन्स्टाग्राम अकाउंट्समध्ये आलिया भट यांचा समावेश असून आपल्या ८५ लाख फॉलोअर्ससह त्या पर्यावरण आणि सामाजिक प्रगतीविषयी प्रसार करत असतात. पर्यावरणपूरक जीवनशैलीशी बांधिलकी जपत त्यानी एड-ए-ममा हा शाश्वत कपड्यांचा ब्रँड तयार केला असून त्याद्वारे लहान मुलांमध्ये पर्यावरणाचे प्रेम निर्माण करण्याचे ध्येय आहे. पृथ्वी आणि लहान मुलांविषयी वाटणाऱ्या प्रेमाचा संगम त्यांनी यात साधला आहे.