वर्षानुवर्षांची असलेली प्रतिक्षा अखेर संपली - मिरा-भाईंदरला मिळाले स्वतंत्र दिवाणी न्यायालय

मिरा-भाईंदर शहरातील लाखो नागरिकांना दिलासा देणाऱ्या आणि न्यायालयीन कामकाजासाठी ठाण्यापर्यंत करावी लागणारी वणवण संपवणाऱ्या बहुप्रतिक्षित दिवाणी न्यायालयाचे आज (८ मार्च) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उद्घाटन सर्वोच न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थित सोहळा पार पडला.
उद्घाटना दरम्यान न्यायमूर्ती ओक यांनी सरकारी यंत्रणांचे कान टोचले याच बरोबर काही गंभीर मुद्द्यांवर स्वतःचे मत मांडून सरकारी अधिकाऱ्यांना धारेवर धरले
What's Your Reaction?






