संरक्षित वनात अतिक्रमणाविरोधात वनविभागाची कारवाई

बिलापाडा, आचोळे व वालीव येथे १६०० चौ. फूट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

संरक्षित वनात अतिक्रमणाविरोधात वनविभागाची कारवाई

वसई, ९ जून: वसई-विरार परिसरातील संरक्षित वनक्षेत्रांमध्ये वाढत्या अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने मोठी कारवाई सुरू केली आहे. नुकतीच नालासोपारा पूर्वेतील बिलापाडा (सर्वे नं. ९४), आचोळे शिर्डी नगर परिसर (सर्वे नं. २५१) आणि वालीव (सर्वे नं. ७६) येथे मांडवी वनविभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई करत सुमारे १६०० चौरस फूट अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली.

या भागातील काही क्षेत्रे तुंगारे अभयारण्य आणि काही संरक्षित वनक्षेत्रांत मोडतात. मागील काही वर्षांपासून या भागांमध्ये अतिक्रमणाचे प्रमाण वाढत चालले असून, या पार्श्वभूमीवर वनविभाग आता अधिक सक्रीय झाला आहे. या कारवाईमुळे वनक्षेत्र पुन्हा मुक्त करण्यात आले आहे.

सदर कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी रिता वै यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वनपाल यतीन तरे, भाकर कुडाळकर, वनरक्षक पद्माकर केंद्रे, संतोष पाटील, पंकज यादव, किशोर राजपूत, स्वाती दराडे, संजय सांबर, विजय राऊत व संजय पागी यांनी सहभाग घेतला.

वनविभागाने स्पष्ट केले आहे की, संरक्षित वनक्षेत्रातील कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही. अशा कारवाया भविष्यातही सातत्याने राबविल्या जाणार आहेत, असे संकेत विभागाकडून देण्यात आले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow