नवी दिल्ली: भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत यूट्यूब चॅनल आज, शुक्रवारी हॅक करण्यात आले. चॅनलवर क्रिप्टोकरन्सी-एक्सआरपीची जाहिरात व्हिडिओ दाखवली जात होती. एक्सआरपी क्रिप्टोकरन्सी यूएस-आधारित कंपनी रिपल लॅब्सने विकसित केली आहे.
सर्वोच्च न्यायालय घटनात्मक खंडपीठांसमोर सूचीबद्ध प्रकरणे आणि सार्वजनिक हिताच्या प्रकरणांची सुनावणी थेट प्रवाहित करण्यासाठी युट्यूब चॅनेल वापरते. अलीकडेच कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या यूट्यूब चॅनलवर लाइव्ह स्ट्रीम करण्यात आली होती हॅकर्सने हा व्हिडीओ प्रायव्हेट बनवून टाकला आहे. या व्हिडीओच्या ऐवजी या चॅनलवर क्रिप्टो करेंन्सी-एक्सआरपीच्या जाहिरातीचा व्हिडीओ दिसतोय. याबाबत सुप्रीम कोर्टाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नेमके काय झाले याबद्दल आम्हाला खात्री नाही. मात्र संकेतस्थळाशी छेडछाड झाल्याचे दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर आज, शुक्रवारी सकाळी ही समस्या उघडकीस आली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आयटी टीमने ती सोडवण्यासाठी एनआयसीची मदत मागितली आहे.
आजकाल, हॅकर्स मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय यूट्यूब चॅनेल्सला लक्ष्य करत आहेत. रिपलने स्वतःचे सीईओ ब्रॅड गार्लिंगहाऊसचे बनावट खाते तयार करण्यापासून हॅकर्सना रोखण्यात अपयशयी ठरल्याचा दावा युट्यूबवर केला आहे. तत्कालीन सरन्यायमूर्ती यु.यु. ललित यांच्या अध्यक्षतेखालील पूर्ण न्यायालयाच्या बैठकीत प्रमुख सुनावणीचे थेट प्रसारण करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. या अंतर्गत, सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये निर्णय घेतला की सर्व घटनापीठांच्या सुनावणी यूट्यूब चॅनेलवर थेट प्रसारित केल्या जातील. देशात 27 सप्टेंबर 2022 रोजी पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण झाले होते. त्यावेळी तत्कालीन सरन्यायमूर्ती एन.व्ही रमणा यांनी त्यांच्या निवृत्तीच्या दिवशी 5 प्रकरणांमध्ये निकाल दिला होता.
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक; चॅनलवर क्रिप्टो करन्सीची जाहिरात झळकली
नवरात्रोत्सवानिमित्त मुंबई पोलीसांकडून 'निर्भया पथ...
मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी त्यांच्या निर्भया पथकातील शूर आणि समर्पित महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान केला. ...
भायंदर : अन्न विषबाधेची भीषण घटना — ३ वर्षांच्या म...
भायंदर : भायंदर पश्चिम येथे अन्नातून विषबाधा झाल्याची एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी रात्री झालेल्या या घटनेत केवळ ३ वर्षां...
मीरा-भाईंदरमध्ये डेंग्यूचा कहर, १० जणांचा संशयित म...
मीरा-भाईंदर:मीरा-भाईंदर शहरात पावसामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्याने आरोग्य धोक्यात आ...
गणेशोत्सव २०२५ : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक...
मुंबई – गणेशोत्सव २०२५ च्या आठव्या दिवशी, मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपतीपैकी एक असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजारो भक्तांनी लाल...
शिरगाव किल्ल्यावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेअंतर्ग...
शिरगाव : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि स्वच्छता महाश्रमदान मोहिमेच्या निमित्ताने दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी शिरगाव येथे शिरगाव किल्ला ...
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; एकाच दिवशी ७८,०...
वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने ११ सप्टेंबर २०२५ रोजी व्यापक कारवाई करत तब्बल ७८,०४...
वसई-विरारमध्ये बेकायदेशीर बांधकामावर कारवाई; सहाय्...
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ :वसई-विरार शहर महानगरपालिका VVCMC ने बेकायदेशीर बांधकामावर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, याचाच भाग म्ह...
वसई रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म ६ व ७ ची दक्षिण बाज...
वसई, २९ ऑगस्ट : पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे की, वसई रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ ...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
भारत आणि मलेशियामध्ये 'संपूर्ण धोरणात्मक भागीदारी' स्थापन करण्याचा निर्णय
दिल्ली, : भारत आणि मलेशियाने मंगळवारी त्यांच्या द्विपक्षीय संबंधांना संपूर्ण धोरणात्मक भागीदारी Co...
शाश्वत, सुरक्षित, पौष्टिक जग निर्माण करण्याचे स्वप्न साकार करूया - पंतप्रधान
नवी दिल्ली: एक शाश्वत, सुरक्षित, सर्वसमावेशक आणि पौष्टिक जग निर्माण कर...
राहुल गांधी नंबर वन दहशतवादी"- रवनीत सिंग बिट्टू
नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी शिखांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. ...
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; पगारात 'इतकी' वाढ होण्याची शक्यता!
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 8 व्या वेतन आयोगासंदर्भातील चर्चांना आता गती मिळाली आहे. यामध्...
Previous
Article