नागपूर :नागपुरच्या दौऱ्यात अमित शहा यांनी बंद दारा आड उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना संपवण्याचा कानमंत्र दिला. पण, उद्धव ठाकरेला जनतेशिवाय कुणीही संपवू शकत नाही. हिंमत असेल तर विधानसभेत खुले आम येवून शिवसेना संपवून दाखवा, असे आव्हान शिवसेना (उबाठा) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले.नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित सभेत ते बाेलत होते. यावेळी खासदार संजय राऊत, भास्कर जाधव, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख, खासदार श्यामकुमार बर्वे आदी उपस्थित होते. यावेळी ठाकरे म्हणाले की,अमित शाह शरद पवार आणि मला संपवण्यासाठी निघाले आहे. नागपुरात बंद दाराआड शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना संपवण्याचे निर्देश दिले. उद्धव ठाकरेला फक्त जनताच संपवू शकते. हा लढा माझा, शरद पवार आणि महाविकास आघाडीचा नाही. तर महाराष्ट्रातील जनतेचा आहे असे ठाकरे यांनी सुनावले. अफजल खानासारखा यांचा राजकारणातील कोथळा वाघनखांनी बाहेर काढू असे ठाकरे म्हणाले. माझ्यावर हिंदुत्व सोडल्याचा, शिवसेनेची काँग्रेस झाल्याचा आरोप करतात. युतीमध्ये पहिले 25 ते 30 वर्षे भाजपासोबत होतो. भाजपाने युती तोडली. तेव्हा हिंदु नव्हतो काय असा सवाल ठाकरे यांनी केला. इतकी वर्षे सोबत राहुन शिवसेनेची भाजपा नाही झाली. तर काँग्रेस सोबत राहून काँग्रेस कशी होईल, असा सवाल ठाकरे यांनी केला. एकत्र आल्या नंतर कद्रुपणा करायचा नाही. पाठीमागून वार करायचा नाही असे ठरवले आहे. रश्मी बर्वे यांना जात प्रमाणपत्र नाकारले. न्यायालयाने ते अवैध ठरवले. आता अवैध ठरवणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असे ठाकरे म्हणाले. मालवणला वर्ष पूर्ण होण्याच्या आधी छत्रपतींचा पुतळा कोसळला. त्यातही पैसे खाल्ले असा आरोप ठाकरे यांनी केला. महाविकास आघाडीतील घटक पक्षांना झुंजवत ठेवून मुख्य शहरातील मोक्याचे भूखंडाचे श्रीखंड बावनकुळेंसारखे लोक खात आहे. आपले सरकार आल्यावर आपल्या माणसांना नवे भूखंड देवू असे ठाकरे यांनी सांगितले. आमचे हिंदुत्व हे साधूसंतांचे आहे. शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आहे. आम्ही हर हर महादेव म्हणणारे आहोत. मिर्झा राजे जयसिंग हिंदूच होता. पण औरंगजेबाचे पाय चाटत होता. तसेच गद्दार आपल्याकडून तिकडे गेले. गद्दारांनीच घात केला. त्याही काळात मिर्झा राजे प्रचंड समुद्रासारखे सैन्य घेऊन आला होता. या राजाचा जीव सिंहासनात नाही तर रयतेत अडकलेला आहे हे त्याला कळलं. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात न लावणारा हा राजा आहे, हे त्याला माहीत होते. म्हणून त्याने रयतेची कत्तल सुरू केली. त्यामुळे महाराजांकडे पर्याय नव्हता. त्यामुळे ते शरण गेले. शिवाजी महाराज आग्र्याला गेले. परत आले. तेव्हा त्यांच्याकडे काहीच नव्हते. राज्य नव्हते, गड किल्ले नव्हते. तसाच आपला पक्ष चोरला आहे. चिन्ह चोरले आहे. माझ्या वडिलांचा फोटो चोरला आहे. पण आता शिवाजी महाराजांची ती जिद्द आपण घ्यायला पाहिजे. म्हणूनच आपण महाराजांची पूजा करत असतो, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
हिंमत असेल तर शिवसेना संपवून दाखवा - उद्धव ठाकरे
नवरात्रोत्सवानिमित्त मुंबई पोलीसांकडून 'निर्भया पथ...
मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी त्यांच्या निर्भया पथकातील शूर आणि समर्पित महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान केला. ...
भायंदर : अन्न विषबाधेची भीषण घटना — ३ वर्षांच्या म...
भायंदर : भायंदर पश्चिम येथे अन्नातून विषबाधा झाल्याची एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी रात्री झालेल्या या घटनेत केवळ ३ वर्षां...
मीरा-भाईंदरमध्ये डेंग्यूचा कहर, १० जणांचा संशयित म...
मीरा-भाईंदर:मीरा-भाईंदर शहरात पावसामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्याने आरोग्य धोक्यात आ...
गणेशोत्सव २०२५ : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक...
मुंबई – गणेशोत्सव २०२५ च्या आठव्या दिवशी, मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपतीपैकी एक असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजारो भक्तांनी लाल...
शिरगाव किल्ल्यावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेअंतर्ग...
शिरगाव : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि स्वच्छता महाश्रमदान मोहिमेच्या निमित्ताने दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी शिरगाव येथे शिरगाव किल्ला ...
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; एकाच दिवशी ७८,०...
वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने ११ सप्टेंबर २०२५ रोजी व्यापक कारवाई करत तब्बल ७८,०४...
वसई-विरारमध्ये बेकायदेशीर बांधकामावर कारवाई; सहाय्...
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ :वसई-विरार शहर महानगरपालिका VVCMC ने बेकायदेशीर बांधकामावर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, याचाच भाग म्ह...
वसई रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म ६ व ७ ची दक्षिण बाज...
वसई, २९ ऑगस्ट : पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे की, वसई रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ ...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
हिवाळी अधिवेशन कधी ? विशेष अधिवेशनात ठरणार तारीख
नागपूर : नव्या मंत्रिमंडळाबाबत अजून कोणतीही घोषणा झालेली नसली तरीही वि...
गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद शांततेत साजरे करा - नांदेड जिल्हाधिकारी
नांदेड: गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण यावर्षी एकाच कालावधीत आ...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सोहळ्यास सोलापुरात रासपचा विरोध
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपुर्ती सोहळा मंगळवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी सोलाप...
Previous
Article