लातूर:जिल्ह्यात २ सप्टेंबर रोजी ३२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. यावेळी त्यांनी उदगीर तालुक्यातील हेर आणि लोहारा शिवारातील पिक नुकसानीची पाहणी केली, तसेच शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. शेतकऱ्यांना एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल. राज्य शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून यावेळी झालेल्या नुकसानीच्या काळातही शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगाने करून शेतकऱ्यांना लवकरात नुसकान भरपाई देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्यासह माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर यावेळी उपस्थित होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस हे लातूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. हा समारंभ झाल्यानंतर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोघेही थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. २ सप्टेंबर रोजी उदगीर, जळकोट तालुक्यातील सर्व महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना तातडीने नुकसान भरपाईबाबत आश्वस्त केले. मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्यानंतर लगेचच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लातूर जिल्ह्यातही अतिवृष्टीने सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आज प्रत्यक्ष पाहणीमध्ये दिसून आले. सोयाबीन पिकामध्ये अजूनही पाणी साचलेले दिसत आहे. यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात येईल. शेतकऱ्यांना मदत करताना नियम, निकष न पाहता एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त नुकसान भरपाई देण्यात येईल. संकट काळात सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. यावेळीही शेतकऱ्यांच्या मागे सरकार पूर्ण ताकदीने उभे राहील, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिला. अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यात येईल. पंचनाम्याचे अहवाल येताच नुकसानभरपाईबाबत पुढील कार्यवाही तातडीने केली जाईल, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर
नवरात्रोत्सवानिमित्त मुंबई पोलीसांकडून 'निर्भया पथ...
मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी त्यांच्या निर्भया पथकातील शूर आणि समर्पित महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान केला. ...
भायंदर : अन्न विषबाधेची भीषण घटना — ३ वर्षांच्या म...
भायंदर : भायंदर पश्चिम येथे अन्नातून विषबाधा झाल्याची एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी रात्री झालेल्या या घटनेत केवळ ३ वर्षां...
मीरा-भाईंदरमध्ये डेंग्यूचा कहर, १० जणांचा संशयित म...
मीरा-भाईंदर:मीरा-भाईंदर शहरात पावसामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्याने आरोग्य धोक्यात आ...
गणेशोत्सव २०२५ : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक...
मुंबई – गणेशोत्सव २०२५ च्या आठव्या दिवशी, मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपतीपैकी एक असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजारो भक्तांनी लाल...
शिरगाव किल्ल्यावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेअंतर्ग...
शिरगाव : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि स्वच्छता महाश्रमदान मोहिमेच्या निमित्ताने दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी शिरगाव येथे शिरगाव किल्ला ...
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; एकाच दिवशी ७८,०...
वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने ११ सप्टेंबर २०२५ रोजी व्यापक कारवाई करत तब्बल ७८,०४...
वसई-विरारमध्ये बेकायदेशीर बांधकामावर कारवाई; सहाय्...
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ :वसई-विरार शहर महानगरपालिका VVCMC ने बेकायदेशीर बांधकामावर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, याचाच भाग म्ह...
वसई रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म ६ व ७ ची दक्षिण बाज...
वसई, २९ ऑगस्ट : पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे की, वसई रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ ...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
नागपुर : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, एकूण 33 कॅबिनेट मंत्र्यांनी तर 6 राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ
नागपूर - महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला आहे. ना...
राज ठाकरे आघाडीत आले तर 'इंडिया' आघाडी त्यांचे स्वागत करेल: राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांचे विधान
पुणे :...
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला; पंतप्रधान मोदींनी ८ महिन्यांपूर्वी केलं होतं अनावरण
महाराष्ट्रः नौदल दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला त...
Previous
Article