आता अटल सेतू मार्गावरुन एनएमएमटीची बस धावणार

आता अटल सेतू मार्गावरुन एनएमएमटीची बस धावणार

नवी मुंबई:नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे अर्थात एनएमएमटीचे वातानुकूलित अतिजलद नवीन बसमार्ग क्र.116 नेरुळ बस स्थानक (पूर्व) ते मंत्रालय मार्गे उलवे, शिवाजीनगर टोल नाका तसेच बसमार्ग क्र.117 खारघर से.35 ते मंत्रालय मार्गे पनवेल, पळस्पे, गव्हाण टोल नाका अशी बससेवा अटल सेतू (MUMBAI TRANS HARBOUR LINK) या मार्गावरुन तुर्भे आगारातून सुरु करण्यात येत आहे.

या मार्गाची ठळक वैशिष्टये खालीलप्रमाणे आहेत.

बस मार्ग क्रमांक 116 - प्रवर्तन – तुर्भे आगार, बससंख्या – 01 वातानुकूलित, प्रवासकाळ- 95 ते 100 मिनिटे, प्रवर्तन काळ - सोमवार ते शनिवार, प्रवास भाडे – रु.230/-, प्रवासमार्ग - नेरुळ बसस्थानक, सागरदिप सोसायटी / शुश्रूषा हॉस्पिटल, आगरी कोळी संस्कृती भवन, से.42 ए बस स्थानक / गायमुख चौक, नमुंमपा मुख्यालय, मोठा उलवा गाव, शगुन रियालटी चौक, बामणडोंगरी रेल्वे स्थानक, उलवे प्रभात हाईट्स, शिवाजीनगर / अटल सेतू टोल नाका, शिवडी-न्हावासेवा अटल सेतू मार्गे शिवडी, डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानक, वाडीबंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल / जीपीओ, गोल्डनगेट / डॉ.बाबासाहेव आंबेडकर चौक, एल.आय.सी. / मंत्रालय डाउुन., प्रवासस्थान - नेरुळ बसस्थानक ते मंत्रालय – 7.55, मंत्रालय ते खारकोपर रेल्वे स्थानक – 9.45, खारकोपर रेल्वे स्थानक ते मंत्रालय -17.20, मंत्रालय ते नेरुळ बस स्थानक – 18.25

बस मार्ग क्रमांक 117 – प्रवर्तन – तुर्भे आगार, बससंख्या – 01 वातानुकूलित, प्रवासकाळ- 115 ते 100 मिनिटे, प्रवर्तनकाळ - सोमवार ते शनिवार, प्रवासभाडे - रु.270/-, प्रवासमार्ग - खारघर से. 35 सर्कल उत्सव चौक, स्पॅगेटी / घरकुल, कळंबोली सर्कल, आसुडगाव आगार, पनवेल एसटी बस स्थानक, भिंगारी, पळस्पेफाटा, महात्मा फुले विद्यालय / करंजाडे फाटा, गव्हाण टोलनाका, शिवडी - न्हावासेवा अटल सेतू मार्गे शिवडी, डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानक, वाडीबंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल / जीपीओ, गोल्डनगेट / बाबासाहेब आंबेडकर चौक, एल. आय. सी / मंत्रालय (डाऊन), प्रवास स्थानक - खारघर से.35 ते मंत्रालय – 7.40, मंत्रालय ते खारघर से.35 -18.15 तरी, नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वतीने करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow