कचरा प्रकल्प स्थळी सांडपाणी टाकणाऱ्या तीन कर्मचारी निलंबित

कचरा प्रकल्प स्थळी सांडपाणी टाकणाऱ्या तीन कर्मचारी निलंबित

भाईंदर:-शहरातील सांडपाण्याचा मैला उत्तनच्या घनकचरा प्रकल्प स्थळी टाकल्या  प्रकरणी महापालिकेने तीन कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेतून मुक्त केले आहे.स्थानिक नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर प्रशासनाने ही कारवाई केली आहे.

मिरा भाईंदर शहरातील मोठ्या गृह-संकुलातील  सांडपाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यासाठी महापालिकेने 'सक्शन कम जेटिंग पंपिंग 'हे आधुनिक वाहन खरेदी केले आहे.त्यानुसार मलप्रवाह वाहनी कार्यान्वित नसलेल्या ठिकाणावरील सांड पाण्याचा मैला या यंत्राद्वारे  पालिकेकडून उचलून स्वच्छ केला जातो.मात्र जमा केलेला हा मैला उत्तनच्या घनकचरा  प्रकल्प स्थळी आणून टाकला जात असल्याची बाब स्थानिक नागरिकांनी उघडकीस आणली होती.हे प्रकरण पेटू लागल्यानंतर पालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी सदर प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाला दिले होते.

त्यावरून महापालिकेच्या  सूचनांचे  उल्लंघन करून मैलाची वाहतूक केल्या प्रकरणी वाहनचालक भावेश दाभोळकर तसेच मलनि:सारण केंद्र स्थळी हा मैला न स्विकारल्याप्रकरणी कनिष्ठ अभियंता के.डी देशमुख आणि
केंद्र कर्मचारी वीरेंद्र सिंग या तिन्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करत असल्याचे आदेश प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow