ठाणे: घोडबंदर येथे पातलीपाडा उड्डाणपूलाजवळ अवजड वाहने उलटल्याने वाहतुक ठप्प

ठाणे: घोडबंदरच्या पातलीपाडा उड्डाणपूलाजवळ दोन अवजड वाहने उलटल्यामुळे घोडबंदर मार्गावरील वाहतुक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या वाहतुक कोंडीमुळे काही वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहने चालवित आहेत, ज्यामुळे कोंडीत अधिक भर पडत आहे.
वाहतुक पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आणि विरुद्ध दिशेने वाहतुक न करण्याचे आवाहन केले आहे. ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने रसायनांनी भरलेली पोती घेऊन कंटेनर वाहतूक करत असताना, कंटेनरमध्ये तब्बल ३५ टन वजनाची पोती होती. बुधवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास कंटेनर पातलीपाडा उड्डाणपूलाजवळ पोहोचल्यावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि कंटेनर उलटला.
या अपघातानंतर आणखी एक अवजड वाहन देखील उलटले. त्यामुळे वाहतुक व्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. अपघातग्रस्त वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर साहित्य असल्यामुळे बुधवारी सकाळी १० नंतरही वाहने रस्त्यावरून बाजूला करणे शक्य झाले नाही. यामुळे काही वाहन चालकांनी विरुद्ध दिशेने वाहतूक सुरू केली असून, त्यामुळे दोन्ही मार्गांवर वाहतुक कोंडी झाली आहे. पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आणि विरुद्ध दिशेने वाहतुक न करण्याचे निर्देश दिले आहेत.
What's Your Reaction?






