पुणे:देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी सर्वप्रथम ग्रामीण भागातील शेतकरी आणि मजूर यांच्या बळकटीकरणाची आवश्यकता आहे. या कार्यात अभियांत्रिकी क्षेत्राची भूमिका महत्त्वाची असून या क्षेत्रात नागरिकांच्या गरजेशी संबंधित तंत्रज्ञानावर संशोधनाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
पुण्यातील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि सीओईपी अभियांत्रिकी माजी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने आयोजित अभियंता दिन कार्यक्रमास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी, महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गीते, नियामक मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुनील भिरूड, कुलसचिव डॉ. दयाराम सोनवणे मानद सचिव डॉ. सुजीत परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते यंदाचा ‘सीओईपी जीवनगौरव पुरस्कार’ हा भगवती स्फेरोकास्ट प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पी. एन. भगवती यांना प्रदान करण्यात आला. तर COEP अभिमान पुरस्कार हा महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्रालयातील प्रधान सचिव प्रवीण दराडे, सिक्कीम येथील कॅबिनेट मंत्री राजू बस्नेत, जेपी मॉर्गन चेसच्या व्यवस्थापकीय संचालक मोनिका पनपलिया, टेस्ला मोटर्सचे वरीष्ठ संचालक हृषिकेश सागर आणि अभिनेता वैभव तत्ववादी यांना देण्यात आला.
आपल्या भाषणात नितीन गडकरी यांनी सर्वप्रथम सर्वांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच ज्यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो, असे एम. विश्वेश्वरय्या यांच्या ऐतिहासिक कार्याचे स्मरण केले. ते पुढे म्हणाले की, कोणत्याही संशोधन कार्यात गरज, आर्थिक व्यवहार्यता या बाबींचा प्रामुख्याने विचार होणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्र अथवा परिसराच्या गरजेनुसार संशोधन केल्यास त्याचा समाजाला चांगला फायदा होऊ शकतो. अर्थात कचऱ्याची समस्या असलेल्या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासोबतच त्याच्यावर प्रक्रिया करून हायड्रोजन निर्मिती करण्यासारखे प्रकल्प उपयुक्त ठरू शकतात. कोणत्याही संशोधनात सामाजिक आणि आर्थिक स्थित्यंतर हे अंतिम ध्येय असले पाहिजे. रोजगाराची निर्मिती करून गरिबी हटवणारे तंत्रज्ञान प्रत्येक क्षेत्रात आणणे आवश्यक आहे. या कार्यात अभियांत्रिकी क्षेत्राची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे, कारण हे संपूर्ण कार्य अभियंत्यांच्या मार्फतच केले जाणार आहे.
नितीन गडकरी पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येयानुसार आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी स्वदेशीचे मूलमंत्र आपण अंगिकारला पाहिजे. आजही सुमारे बहुतांश नागरिक ग्रामीण भागात राहतात, तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित अर्थव्यवस्था हा त्यांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य स्त्रोत आहे. त्यामुळे संशोधन आणि तंत्रज्ञानाची जोड देत कृषी अर्थव्यवस्थेला आपणास पाठबळ द्यावेच लागेल. गेल्या काही काळात शेतकरी हा केवळ अन्नधान्याचा उत्पादक राहिलेला नसून तो ऊर्जादाताच्या भूमिकेतही शिरला आहे. कृषी क्षेत्रात देखील अनंत संधी दडलेल्या असून आपली इंधनाची सध्याची आणि भविष्यातली देखील गरज भागवण्याची क्षमता कृषी उद्योगात आहे. ग्रामीण भागाच्या गरजा आणि गरजवंतांचा मानवी चेहरा केंद्रस्थानी ठेवून संशोधन करीत तंत्रज्ञानाचा विकास झाल्यास ग्रामीण भागातून येणारे लोंढे गावातच थांबतील आणि त्यांना स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. कृषी उद्योगाला ऊर्जा निर्मितीचाही पर्याय दिल्यास अधिक क्षमतेने प्रगती करता येईल, असा मला विश्वास आहे.
ऑटोमोबाईल क्षेत्रातही भारताची वाटचाल अत्यंत वेगाने होत असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. ते म्हणाले, ऑटोमोबाईल क्षेत्राचा विचार केल्यास भारत नुकतेच जपानला मागे टाकून तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. पहिल्या क्रमांकावरील अमेरिकेतील ऑटोमोबाईल उद्योग हा सुमारे 78 लाख कोटी रुपयांचा आहे, दुसऱ्या क्रमांकावरील चीनमध्ये हा आकडा 44 लाख कोटी रुपये इतका आहे. तर, भारतातील ऑटोमोबाईल उद्योगाचे क्षेत्र हे 22 लाख कोटी रुपयांचे असून आगामी काळात त्यामध्ये प्रचंड मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मिरमध्ये लिथियमचा साठा सापडल्यामुळे भविष्यात सेमीकंडक्टरच्या बाबतीतही भारत मोठा उत्पादक देश बनेल. महामार्गांच्या बाबतीतही देशात योग्य दिशेने काम सुरू असून महाराष्ट्रात अटल सेतू मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेला जोडण्याचे काम लवकरच सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी दिली.
देश आत्मनिर्भर बनवण्यासाठी शेतकरी आणि मजूर यांच्या बळकटीकरणाची आवश्यकता - नितीन गडकरी
नवरात्रोत्सवानिमित्त मुंबई पोलीसांकडून 'निर्भया पथ...
मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी त्यांच्या निर्भया पथकातील शूर आणि समर्पित महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान केला. ...
भायंदर : अन्न विषबाधेची भीषण घटना — ३ वर्षांच्या म...
भायंदर : भायंदर पश्चिम येथे अन्नातून विषबाधा झाल्याची एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी रात्री झालेल्या या घटनेत केवळ ३ वर्षां...
मीरा-भाईंदरमध्ये डेंग्यूचा कहर, १० जणांचा संशयित म...
मीरा-भाईंदर:मीरा-भाईंदर शहरात पावसामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्याने आरोग्य धोक्यात आ...
गणेशोत्सव २०२५ : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक...
मुंबई – गणेशोत्सव २०२५ च्या आठव्या दिवशी, मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपतीपैकी एक असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजारो भक्तांनी लाल...
शिरगाव किल्ल्यावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेअंतर्ग...
शिरगाव : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि स्वच्छता महाश्रमदान मोहिमेच्या निमित्ताने दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी शिरगाव येथे शिरगाव किल्ला ...
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; एकाच दिवशी ७८,०...
वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने ११ सप्टेंबर २०२५ रोजी व्यापक कारवाई करत तब्बल ७८,०४...
वसई-विरारमध्ये बेकायदेशीर बांधकामावर कारवाई; सहाय्...
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ :वसई-विरार शहर महानगरपालिका VVCMC ने बेकायदेशीर बांधकामावर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, याचाच भाग म्ह...
वसई रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म ६ व ७ ची दक्षिण बाज...
वसई, २९ ऑगस्ट : पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे की, वसई रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ ...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
एसटीच्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय
पुणे:महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळातील एमएसआरटीसी कर्मचाऱ्या...
पुणे: मिरवणुकीत तरुणांच्या मृत्यूप्रकरणी मंडळाच्या अध्यक्षासह चौघांवर गुन्हा दाखल, वडगाव शेरीतील दुर्देवी घटना
पुणे: पैगंबर जयंतीनिमित्ताने काढलेल्या मिरवणुकीत झेंडा फडकावणाऱ्या दोन...
फर्निचर दुरुस्तीच्या किरकोळ वादातून ६५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू
फर्निचर दुरुस्तीच्या कामावरून मित्राच्या घरी झालेला किरकोळ वाद गंभीर भांडणात परिवर्तित झाला, ज्यामुळे ६५ वर्षीय तारा राजा राम यांचा दुर्दैवी मृत्यू...
पुण्यात 20 वर्षीय महिला पोलीस कॉन्स्टेबलने नदीत उडी मारली; शोध सुरू
पुणे, जिल्ह्यातील अळंदी येथील मंदिर शहरात रविवारी सायंकाळी एक 20 वर्षीय महिला पोलीस कॉन...
Stay Connected
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महापालिकेला इशारा, सात दिवसांची अल्टिमेटम
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून मह...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी नाही
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील का...
Previous
Article