बहुजन विकास आघाडीला अखेर शिट्टीचे चिन्ह मिळाले उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले

बहुजन विकास आघाडीला सोमवारी सकाळी शिट्टी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे पक्षाला मोठा दिलासा मिळाला असून पालघर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी शिटी चिन्ह परत मिळाल्याने जल्लोष साजरा केला.
पालघर जिल्ह्यात बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार असून पक्षाचे पारंपरिक चिन्ह 'शिट्टी' आहे. 30 जानेवारी 2024 रोजी निवडणूक आयोगाने जनता दल (संयुक्त) पक्षासाठी 'शिट्टी' हे चिन्ह आरक्षित केले होते. परंतु त्यानंतर 23 मार्च 2024 रोजी भारतीय निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या नवीन अधिसूचनेमध्ये 'शिट्टी' हे चिन्ह मुक्त चिन्हांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे अनेक अपक्ष उमेदवारांनी 'शिट्टी' या चिन्हाची मागणी केली होती. निवडणूक आयोगाच्या दोन निर्णयांमुळे हा संभ्रम निर्माण होऊन बविआच्या हातातून शिटी निसटण्याची शक्यता निर्माण झाली होती. यासंदर्भात बहुजन विकास आघाडीने उच्च न्यायालयात दाद मागितली. या याचिकेत बहुजन विकास आघाडीने निवडणूक आयोगाचे ३० जानेवारीचे पत्र आणि त्यावरील निकालांवर आक्षेप घेतला आहे.
What's Your Reaction?






