मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर गंभीर पडसाद

सावंतवाडी :छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणमध्ये कोसळल्यानंतर त्याचे गंभीर पडसाद शिवप्रेमी आणि शिवसैनिकांकडून उमटले आहेत.
ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी या घटनेला सार्वजनिक बांधकाम विभागाला दोषी धरत थेट सार्वजनिक बांधकामच्या मालवण कार्यालयात जात कार्यालयाची तोडफोड केली .
तसेच प्रत्येक कामात भ्रष्टाचार करत टक्केवारी घेत असल्याचा आरोप केला.छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहेत. छत्रपतींचा पुतळा पडण्यामागे सार्वजनिक बांधकाम विभागच दोषी आहे अशी तीव्र प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी यावेळी व्यक्त केली.
What's Your Reaction?






