मिरा-भाईंदर शहरात रस्त्यांवर ‘स्मार्ट डब्बे’; कचरा व्यवस्थापनासाठी ११ कोटींचा निधी मंजूर

मिरा-भाईंदर | ५ जून २०२५ : मिरा-भाईंदर महापालिकेने शहरातील स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी ‘स्मार्ट डब्बे’ बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत रस्त्यांच्या कडेला आधुनिक आणि डिजिट यंत्रणेशी जोडलेले कचरा संकलन डब्बे उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी एकूण ११ कोटी रुपयांचा शासकीय निधी मंजूर करण्यात आला आहे.
सध्या मिरा-भाईंदर महानगर क्षेत्रातून रोज मोठ्या प्रमाणावर कचरा जमा होतो, जो उन येथील घनकचरा प्रकल्पात हलवण्यात येतो. हे काम सध्या खासगी कंत्राटदारांच्या माध्यमातून राबवले जात आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक १, २, ३ मध्ये 'लोब वे मॅनेजमेंट' या कंपनीकडे तर प्रभाग क्रमांक ४, ५, ६ मध्ये 'कोणार्क' या कंपनीकडे कचरा संकलनाचे काम सोपवण्यात आले आहे.
नवीन बसवले जाणारे ‘स्मार्ट डब्बे’ हे डिजिटल यंत्रणेशी जोडलेले असतील. त्यामुळे कोणत्या डब्यात किती कचरा जमा झाला आहे, ते वेळोवेळी ऑनलाइन ट्रॅक करता येणार आहे. यामुळे वेळेवर कचरा उचलणे, वाहतुकीचा अचूक नियोजन आणि शहरातील स्वच्छता राखणे सुलभ होणार आहे.
महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, हा प्रकल्प ‘स्वच्छ भारत अभियान’ आणि ‘स्मार्ट सिटी’ या उपक्रमांच्या धर्तीवर राबवला जाणार आहे.
शहरातील स्वच्छता टिकवण्यासाठी नागरिकांनी देखील डब्यांचा योग्य वापर, ओला-सुका कचऱ्याची योग्य विल्हेवाट आणि वेळेवर कचरा बाहेर ठेवण्याचे पालन करणे अपेक्षित आहे.
मिरा-भाईंदर शहरात ‘स्मार्ट डब्बे’ बसवण्याचा निर्णय हा शहराच्या स्वच्छतेसाठी आणि स्मार्ट यंत्रणेकडे वाटचाल करणारा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे केवळ कचरा व्यवस्थापनच नव्हे तर शहराची एकंदर स्वच्छ प्रतिमा अधिक उजळण्यास मदत होईल.
What's Your Reaction?






