मीरा-भाईंदरमधील महाराजांच्या नव्या पुतळ्याचे ऑडिट होणार

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर भागातील सगनाई देवी मंदिराजवळ ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याकडे जाणाऱ्या मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रॉन्झ धातूचा ५० फुटांचा पुतळा ३ कोटी रुपये खर्च करून उभारण्याचा निर्णय महापालिकेने २०१९ मध्ये घेतला होता. पुतळा साकारण्याचे काम काही वर्षांपासून सुरू होते. ते पूर्ण झाल्यानंतर निश्चित केलेल्या ठिकाणी पुतळा बसवण्यात आला असलातरी काही काम प्रलंबित असल्याने पुतळ्याचे लोकार्पण न करता तो झाकून ठेवण्यात आला आहे. हा पुतळा उभारल्यानंतर कंत्राटदाराकडून त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. परंतु मालवण घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका शिवरायांच्या पुतळ्याचे पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट करणार आहे. पुतळ्याचे ऑडिट व किरकोळ प्रलंबित असलेले काम पूर्ण झाल्यानंतरच त्याचे लोकार्पण केले जाणार असल्याचे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.
What's Your Reaction?






