मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी अचानक तबीयत बिगडल्याने आजच्या सर्व कार्यक्रमांना स्थगित करण्यात आले आहे. डॉक्टरांनी मुख्यमंत्री यांना आज दिवसभर आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
मुख्यमंत्री सचिवालयानुसार, मुख्यमंत्री काल दिल्लीमध्ये दौऱ्यावर होते. मुंबईत परतल्यानंतर आज सकाळी त्यांना थकवा जाणवला. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्या वर्षा बंगल्यावरच वैद्यकीय चेकअप केला आणि आराम करण्याचा सल्ला दिला. याच कारणामुळे आज होणारी कॅबिनेट बैठक आणि इतर सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. याचप्रमाणे सोलापुरात होणारा शासकीय कार्यक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.
Previous
Article