विवाच्या प्रांगणात रंगली जनसंपर्काच्या माध्यमातून उत्पादन मोहीम

विरार:जनसंपर्क ही काळाची गरज असून जनसंपर्काच्या माध्यमातून आपण लोकांशी संपर्क वाढवू शकतो. जनसंपर्क हे लोक कल्याणासाठी केले जाते, त्याचचरोबर व्यवसायाच्या दृष्टिकोनातून देखील जनसंपर्क क्षेत्राकडे पाहिले जाते. कोणतेही कार्य लोकांपर्यंत पोहोचावायचे असेल तर, त्यासाठी जनसंपर्क दांडगा असायला हवाच. त्याचबरोबर आपले उत्पादन सर्वांपर्यंत कसे पोहोचवायचे बाचे मार्गदर्शन देखील जनसंपर्क करत असते. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून या क्षेत्रात भविष्यात विविध संधी निर्माण झालेल्या आहेत. मास मीडिया कोर्समध्ये द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये जनसंपर्क हा विषय विद्यापीठाने समाविष्ट केलेला आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनात पुस्तकी ज्ञानासोबतच त्या त्या विषयाचे सराब (प्रैक्टिकल) ज्ञान असणे सुद्धा गरजेचे आहे. यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मोठी मदत होते. विद्याथ्यांच्या करियरच्या दृष्टिकोनातून त्यांना उपयोगी पडणाऱ्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन विवा महाविद्यालयात केले जाते. विवा महाविद्यालयाच्या
द्वितीय वर्ष बीएएमएमसीच्या विद्याथ्यांनी कॉपोरेट कम्युनिकेशन अँड पब्लिक रिलेशन या विषयांतर्गत सीसीपीआर प्रोडक्ट कॅम्पेन गिग या एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात विद्याथ्यांनी विविध स्टॉल्स लावले होते. यामध्ये एनजी ड्रिंक, अरोमा, फॉग परफ्यूम दुरिझम, फूड ब्रेड, मसाला बाहार अशा विविध वस्तूंचे स्टॉल्स विद्यार्थ्यांनी उभारले होते. सोबतच वेगवेगळे खेळ, किज, स्पर्धा या हा उपक्रम अजून रंगत गेला. या कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार शिखर हितेंद्र ठाकूर यांनी हजेरी लावली. विद्यास्यांनी मांडलेल्या विविध स्टॉल्सवरील उत्पादनाबद्दल पाहुण्यांना माहिती दिली. मुलांनी बनवलेले उत्पादने, भेटवस्तू देऊन पाहुण्यांचे
स्वागत केले. पाहुण्यांनी कॅम्पेनमधील खेळ, किझ यात सहभागी होऊन विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला हा कार्यक्रम बीएएमएमसी विभागाचे सहा, प्राध्यापक मोहसीन शेख यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात पार पडला. विभागाच्या प्रमुख शाहीन महिडा यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना सहकार्य केले. विद्यार्थ्यांना उत्पादन ब्रेडबद्दल माहिती सांगून जनजागृती करणे, उत्पादनाबाबत प्रतिस्दी देऊन जनसंपर्क या विषयांचे प्रेक्टिकल ज्ञान मिळावे या दृष्टिकोनातून विषय शिक्षक मोहसीन शेख यांनी सीसीपीआर प्रोडक्ट गिग कैम्पेनचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विविध विभागातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विष्णू वामन अकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, ट्रस्टच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस. एन, पाध्ये, जिया महाविद्यालयाचे समन्वयक नारायण कुट्टी, विवा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. अडिगल, विचा महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे, उपप्राचार्या डॉ. दिपा वर्मा यांचे मार्गदर्शन लाभले.
What's Your Reaction?






