कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लुट ?

कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लुट ?

नांदगाव:कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांकडून 50 ते दीडशे रुपये पर्यंत कपात करण्यात येत असून या कपातीचा कोणत्याही प्रकारचा हिशोब किंवा नोंद बाजार समितीतर्फे देण्यात येणाऱ्या पावत्यांवर करण्यात येत नाही. एकच ग्राहकाला विक्रीच्या दोन पावत्या देऊन त्या पावत्यांमधील मूळ रकमेत फरक आढळून येत आहेत. याबाबत न्यायडोंगरी येथील तक्रारदार शेतकरी जगन्नाथ पाटील यांनी तोंडी व लेखी तक्रार करून विचारणा केली मात्र सभापती व संचालक या सगळ्यांनी त्यांना उडवडीची उत्तरे दिली. गेल्या दहा ते बारा दिवसापासून पैसे कशाचे कपात केली याबाबत पाटील विचारणा करत आहेत मात्र त्यांना केवळ उडवली ची उत्तर देण्यात येत आहे. आमच्या कडून शंभरच्या ऐवजी दोनशे रुपयांची कपात करावी मात्र त्या पैशाचा हिशोब आम्हाला द्यावा अशी मागणी पाटील यांनी केली असून माझ्यासारख्या अशा शेकडो शेतकऱ्यांकडून बेहिशोबी पैसे कट करून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करण्याचा धडाका नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने लावला असून या शेतकऱ्यां कडून अशा स्वरूपात पैसे कट झाले असतील त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की न्यायडोंगरी येथील शेतकरी जगन्नाथ पाटील यांनी दिनांक १६/०८/२०२४ रोजी नांदगांव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी आणलेला होता सदरचा कांदा व्यापारी भिवराज भगीरथ फोफलिया (राहुल ट्रेडर्स )यांनी १६११ रुपये प्रती क्विंटल या दराने विकत घेतला त्याचे वजन ६.८० (सहा क्विंटल ऐंशी किलो )आले असून त्याची एकूण रक्कम १०९५५ इतकी झालेली आहे. तशी हिशोब पट्टी पावती क्रमांक ५४६ मला देण्यात आलेली आहे, परंतु काटा पट्टी नंबर १०६८४६३ मध्ये मात्र एकूण खर्च ८२.९६ वजा करून मला १०८७२ रूपये रोख देण्यात आले आहेत सदरचा खर्च कशाचा कापुन घेण्यात आला या बाबत कोणताही खुलासा या काटा पट्टी वर करण्यात आलेला नाही ?तर हिशोब पट्टीवर मात्र खर्च हे सदर निरंक दाखविण्यात आलेले आहे व तशा कृषी उत्पन्न बाजार समितीचा शिक्का असलेल्या दोन पावत्या पाटील यांना देण्यात आलेल्या आहेत. (त्या दोन्ही पावत्याची फोटो प्रत या बातमी सोबत जोडलेली आहे .एकाच मालाची विक्री झालेल्या एकाच वजनाच्या एकाच भावाच्या दोन पावत्या असून दोघा पावत्यावरीलच्या रकमेमध्ये मात्र तफावत आहे. त्यामुळे या अशा पद्धतीच्या पावत्या कोणत्या नियमाच्या आधारे व का देण्यात येतात तसेच यात खर्चापोटी वजा करण्यात आलेली रक्कम ही नेमकी कोणत्या खर्चपोटी वजा करण्यात आली. याबाबतचा लेखी खुलासा त्वरित करण्यात यावा अशी लेखी तक्रार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सचिव यांचे कडे करून लेखी खुलासा मागितला असता तक्रार करून पाच दिवस झाले तरीही कोणताही खुलासा करण्यात आलेला नसून या बाबत कृषी उत्पन्न बाजार समिती कडून मौन बाळगण्यात आले आहे. .तेंव्हा अश्या विना तपशील अंदाजे खर्च कपात करून शेतकऱ्यांना खुलेआम लुटले जात असल्याने याचा जाहीर खुलासा बाजार समिती, यांनी करावा असे खुले आवाहन पाटील यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow