मीरा -भाईंदर पालिकेची विविध अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई

मीरा -भाईंदर पालिकेची विविध अनधिकृत बांधकामांवर  तोडक कारवाई
प्रभाग समिती क्र. 06 कार्यक्षेत्रातील मीनाक्षी नगर, काशीगाव येथील अनधिकृतरित्या वीट बांधकामावर तोडक कारवाई करण्यात आली.

मिरा भाईंदर - मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून तोडक कारवाई करण्यात येत आहे. महापालिकेच्या वेगवेळ्या  प्रभाग समितीमध्ये करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेच्या अतिक्रम विभागाकडून तोडक कारवाई केली जात आहे. आतापर्यंत महानगरपालिकेकडून अनेक अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत जागा मोकळी करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये विटांपासून आणि पत्र्यापासून बनवलेल्या तात्पुरत्या घरांचा आणि इतरही बांधकामांचा समावेश आहे. 

काल 12 डिसेंबर रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्र. 06 कार्यक्षेत्रातील काजूपाडा या ठिकाणी  अनधिकृतरित्या वीट बांधकामाच्या सहाय्याने बनवलेल्या 03 व पत्र्याच्या सहाय्याने बनवलेल्या 09 घरांवर महापालिका अतिक्रमण विभागामार्फत तोडक कारवाई करण्यात आली. तर 11 डिसेंबर रोजी  प्रभाग समिती क्र. 06 कार्यक्षेत्रातील मीनाक्षी नगर, काशीगाव सर्वे क्र. 41, 44, 45 या ठिकाणी अनधिकृतरित्या वीट बांधकामाच्या सहाय्याने बनवलेल्या 4 व पत्र्याच्या सहाय्याने बनवलेल्या 16 घरांवर तोडक कारवाई करण्यात आली. 

त्या आधी प्रभाग समिती क्रमांक 06 कार्यक्षेत्रातील काजुपाडा, दाचकुल पाडा व मांडवी पाडा येथील अनधिकृत रित्या विट बांधकामाच्या साहाय्याने बनवलेल्या ०४ व पत्र्याच्या साहाय्याने बनवलेल्या ०६ घरांवर महापालिका अतिक्रमण विभागामार्फत मोहीम राबवून अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. 

तसेच  प्रभाग समिती क्रमांक 04 कार्यक्षेत्रातील कनकिया रोड येथील जय शिवालय इमारती जवळील मोकळ्या जागेत बनवलेल्या अनधिकृत वीट बांधकामावर महापालिका अतिक्रमण विभागामार्फत तोडक कारवाई करण्यात आली. 

महापालिकेचा अतिक्रमण विभाग आता अनधिकृत बांधकामाविषयी कारवाई करताना दिसत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात इतरही अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाई होणार असल्याचे या मोहिमेमुळे दिसून येत आहे. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow