अंबरनाथमध्ये एका इस्टेट एजंटची मंगळवारी रात्री धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली. जमिनीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. हत्येच्या काही तासातच पोलिसांनी या घटनेचा शोध घेत संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. संजय पाटील यांनी जुने अंबरनाथ येथे काही वर्षांपूर्वी एमआयडीसी मध्ये जमीन खरेदी केली होती. मूळ मालकाने हीच जमीन पुन्हा दुसऱ्या मालकाला विकल्यानंतर जमीन मालक आणि संजय पाटील यांच्यात वाद झाला होता. मंगळवारी रात्री संजय पाटील मेफ्लावर गार्डनबाहेर उभे असताना दोन व्यतींनी येऊन धारधार शस्त्रांनी त्यांची हत्या केली. हे वार इतके जबरदस्त होते की पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनने त्वरित गुन्हा दाखल करून तपास सुरु करून सुरज पाटील आणि हर्ष पाटील या दोन भावांना बेड्या ठोकल्या आहेत. जमिनीच्या वादातूनच हत्या केल्याची कबुली दोघांनीही दिली आहे.