नवी दिल्ली: भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक व्यवहार ब्युरो यांनी उभय देशांमधील घनिष्ठ द्विपक्षीय संबंध कायम राखण्यासाठी आणि उत्तम सांस्कृतिक समज वाढवण्याच्या उद्देशाने जुलै 2024 मध्ये सांस्कृतिक संपत्ती करारावर स्वाक्षरी केली होती. सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी सहकार्य वाढवण्यासाठी अध्यक्ष बायडेन आणि पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलेली वचनबद्धता पूर्ण करणे हा यामागचा उद्देश असून जून 2023 मधील त्यांच्या बैठकीनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात ते प्रतिबिंबित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या निमित्ताने, अमेरिकेने भारतातून चोरीला गेलेल्या किंवा तस्करी करून नेण्यात आलेल्या 297 प्राचीन कलाकृती परत करण्यात मदत केली आहे . त्या लवकरच भारताला परत केल्या जातील. विल्मिंग्टन, डेलावेअर येथे झालेल्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष बायडेन यांना प्रतिकात्मक स्वरूपात काही निवडक कलाकृती दाखवण्यात आल्या. या कलाकृती परत करण्यासाठी अध्यक्ष बायडेन यांनी केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले. त्यांनी नमूद केले की या कलाकृती केवळ भारताच्या ऐतिहासिक भौतिक संस्कृतीचा भाग नाहीत, तर भारतीय संस्कृती आणि चेतनेचा आंतरिक गाभा आहेत . या प्राचीन कलाकृती सुमारे 4000 वर्षे जुन्या कालखंडातील 2000 ईसवीसन पूर्व ते 1900 ईसवी सना पर्यंतच्या काळातील आहेत आणि त्यांचा उगम भारताच्या विविध भागांमध्ये झाला आहे. यातील बहुतांश प्राचीन वस्तू पूर्व भारतातील टेराकोटा कलाकृती आहेत, तर इतर दगड, धातू, लाकूड आणि हस्तिदंताने बनवलेल्या आहेत आणि त्या देशाच्या विविध भागांतील आहेत. हस्तांतरित केलेल्या काही उल्लेखनीय प्राचीन कलाकृती पुढीलप्रमाणे : मध्य भारतातील 10-11व्या शतकातील वाळूच्या दगडातील अप्सरेची मूर्ती;मध्य भारतातील 15-16 व्या शतकातील कांस्य धातूमधील जैन तीर्थंकर यांची मूर्ती ;पूर्व भारतातील तिसऱ्या-चौथ्या शतकातील टेराकोटा फुलदाणी;दक्षिण भारतातील इ.स.पूर्व 1 ते इसवी सन पहिले शतक काळातील दगडी शिल्पदक्षिण भारतातील 17-18 व्या शतकातील कांस्य धातूमधील भगवान गणेश मूर्ती ;उत्तर भारतातील 15 व्या -16 व्या शतकातील वाळूच्या दगडापासून बनवलेली भगवान बुद्धाची उभी प्रतिमा ;पूर्व भारतातील 17-18 व्या शतकातील कांस्य धातूतील भगवान विष्णूची मूर्ती ;उत्तर भारतातील 2000-1800 BCE मधील तांब्यापासून तयार मानवरुपी आकृती ;दक्षिण भारतातील 17-18 व्या शतकातील कांस्य धातूतील भगवान कृष्णाची मूर्ती;दक्षिण भारतातील 13-14 व्या शतकातील ग्रॅनाइटमधील भगवान कार्तिकेय यांची मूर्ती अलीकडच्या काळात, सांस्कृतिक मालमत्ता परत करणे हा भारत-अमेरिका सांस्कृतिक समज आणि आदानप्रदान मधील एक महत्त्वाचा पैलू बनला आहे. 2016 पासून,अमेरिका सरकारने मोठ्या प्रमाणात तस्करी किंवा चोरीला गेलेल्या प्राचीन कलाकृती भारतात परत आणण्यात मदत केली आहे. जून 2016 मध्ये पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान 10 प्राचीन कलाकृती परत करण्यात आल्या; सप्टेंबर 2021 मधील त्यांच्या दौऱ्यादरम्यान 157 प्राचीन कलाकृती आणि गेल्या वर्षी जूनमध्ये त्यांच्या दौऱ्यादरम्यान आणखी 105 प्राचीन कलाकृती परत करण्यात आल्या. 2016 पासून अमेरिकेतून भारताला परत केलेल्या सांस्कृतिक कलाकृतींची एकूण संख्या 578 झाली आहे. कोणत्याही देशाद्वारे भारताला परत केलेल्या सांस्कृतिक कलाकृतींची ही सर्वाधिक संख्या आहे.
अमेरिकेने भारताला 297 प्राचीन कलाकृती परत केल्या
नवरात्रोत्सवानिमित्त मुंबई पोलीसांकडून 'निर्भया पथ...
मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी त्यांच्या निर्भया पथकातील शूर आणि समर्पित महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान केला. ...
भायंदर : अन्न विषबाधेची भीषण घटना — ३ वर्षांच्या म...
भायंदर : भायंदर पश्चिम येथे अन्नातून विषबाधा झाल्याची एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी रात्री झालेल्या या घटनेत केवळ ३ वर्षां...
मीरा-भाईंदरमध्ये डेंग्यूचा कहर, १० जणांचा संशयित म...
मीरा-भाईंदर:मीरा-भाईंदर शहरात पावसामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्याने आरोग्य धोक्यात आ...
गणेशोत्सव २०२५ : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक...
मुंबई – गणेशोत्सव २०२५ च्या आठव्या दिवशी, मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपतीपैकी एक असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजारो भक्तांनी लाल...
शिरगाव किल्ल्यावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेअंतर्ग...
शिरगाव : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि स्वच्छता महाश्रमदान मोहिमेच्या निमित्ताने दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी शिरगाव येथे शिरगाव किल्ला ...
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; एकाच दिवशी ७८,०...
वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने ११ सप्टेंबर २०२५ रोजी व्यापक कारवाई करत तब्बल ७८,०४...
वसई-विरारमध्ये बेकायदेशीर बांधकामावर कारवाई; सहाय्...
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ :वसई-विरार शहर महानगरपालिका VVCMC ने बेकायदेशीर बांधकामावर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, याचाच भाग म्ह...
वसई रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म ६ व ७ ची दक्षिण बाज...
वसई, २९ ऑगस्ट : पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे की, वसई रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ ...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
मगध एक्स्प्रेसचे कपलिंग तुटून ट्रेनचे दोन भाग, सुदैवाने अनर्थ टळला
पाटणा:पाटणाकडे जाणाऱ्या मगध एक्स्प्रेसला 20802 रविवारी दुपारी रघुनाथ...
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक; चॅनलवर क्रिप्टो करन्सीची जाहिरात झळकली
नवी दिल्ली: भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत यूट्यूब चॅनल आज, शुक्रव...
कुठलेही अवैध धार्मिक अतिक्रमण हटवलेच पाहिजे- सुप्रीम कोर्ट
नवी दिल्ली : रस्त्यावर अवैधपणे उभारलेले कुठलेही धार्मिक अतिक्रमण असो त...
भारत जगातील सर्वात चैतन्यशील अर्थव्यवस्था बनली - उपराष्ट्रपती
नवी दिल्ली:भारत ही आता जगातील सर्वात चैतन्यशील अर्थव्यवस्था बनली असून ...
Previous
Article