एक डिपो, चार मेट्रो मार्ग: मोगरपाडा ठरणार मुंबईचं सर्वात मोठं मेट्रो डेपो

एमएमआरडीएला मिळालं मोगरपाडा (ठाणे) इथं १७४ हेक्टर जागेचं हस्तांतरण, मेट्रो मार्ग ४, ४ए, १० व ११ साठी मुख्यालय मुंबई | १५ जून २०२५ महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री व एमएमआरडीए अध्यक्ष श्री. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, मुंबई मेट्रोच्या विस्तारासाठी मोगरपाडा येथे १७४.०१ हेक्टर जागा एमएमआरडीएच्या ताब्यात आली आहे.
ही डेपो मेट्रो मार्ग ४, ४ए, १० व ११ साठी एकात्मिक देखभाल केंद्र म्हणून कार्य करेल, जे सुमारे ५५.९९ किमी लांब मेट्रो नेटवर्कला सेवा देईल.
डेपोची वैशिष्ट्ये: ६४ स्टेबलिंग लाइन, १० वर्कशॉप लाइन, १० तपासणी लाइन व्हील लेथ मशीन, ऑटोमॅटिक ट्रेन वॉश सिस्टीम डेपो कंट्रोल सेंटर आणि ट्रेनींग रूम्स बांधकाम स्थिती: ₹९०५ कोटींचा कंत्राट एसईडब्ल्यू–वीएसई जेव्ही या कंपनीला देण्यात आला आहे. कामास १३ जून २०२५ पासून सुरूवात झाली आहे. शेतीपुरक पुनर्वसन मॉडेल: लीज असलेल्या शेतकऱ्यांना २२.५% आणि अतिक्रमकांना १२.५% विकसित भूखंड दिले जातील. परिणाम: १२ लाख प्रवासी रोज प्रवासाचा वेळ ५०% ने कमी पूर्व उपनगर व ठाण्यात विकासाचा वेग वाढणार
What's Your Reaction?






