गिरीज मध्ये भीषण अपघात:दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू

गिरीज मध्ये भीषण अपघात:दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू

वसई : ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गिरीज, बदामी स्टॉप येथे कार व दुचाकी अपघातात एका दुचाकी धारकाचा जागीच मृत्यु झाल्याने गिरीज गावावर शोककळा पसरली. हा अपघात इतका भीषण होता, दुचाकीधारकाचा घटना स्थळी मृत्यु झाला. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेत किरण परमानंद पाटील (४७) रा. दत्त नगर, गिरीज असे मृत दुचाकी चालकाचे नाव आहे. तर यातील कार चालक आरोपी वेद प्रशांत पाटील (२४) रा. वसई हा जीप कंपनीची कार क्रमांक एम एच ४८ ए डब्ल्यू ६२३७ मधुन गिरीज वरुन वसईच्या दिशेने भरघाव वेगात जात होता. त्यावेळी एक्टीव्हा क्रमांक एम एच ४८ ए एच ६९२९ वरुन गिरीजच्या दिशेने जाणाऱ्या किरण यास जबर धडक दिली.

ही धडक इतकी भिषण होती, दुचाकीला धडक दिल्यानंतरही ही कार थांबली नाही. नियंत्रण गमावलेल्या कार चालकाने येथील महावितरणच्या खांबाला धडक दिली. यात कारचे पुढील चाक तुटून दुसऱ्या दिशेला फेकले गेले. दोन्ही वाहानांचे नुकसान पहाता, या अपघाताची भीषणता सहज लक्षात येते. अपघाता नंतर वैद्यकीय ईलाजासाठी दुचाकी चालकास बंगली येथे कार्डिनल ग्रेशीयस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले परंतु, तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. किरण हा मितभाषी, सुस्वभावी व्यक्तिमत्व म्हणून या परिसरात परिचित होता. ऐन दिवाळी सणाच्या दिवशी त्याच्या अचानक अश्या जाण्याने या गावावर दुःखाचे सावट पसरले. त्याच्या पश्चात पत्नी, १३ वर्षीय मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे. शनिवारी दुपारी गिरीज येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्याच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. याबाबत वसई पोलीस ठाण्यामध्ये कार चालका विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow