चांदीप भागात वावर असल्याचे व्हायरल:नागरिकांत घबराट, वन विभागाचा सावध पवित्रा

खानिवडे : वसईत पुन्हा बिबट्याचा संचार? पूर्वेतील चांदीप या अभयारण्याच्या सीमेवरील गावात मंगळवारी रात्री बिबट्याचा वावर असल्याची पोस्ट समाज माध्यमांतून प्रसारित झाल्याने या भागातील तसेच या भागातून जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांसह स्थानिक रहिवाशांत घबराट निर्माण झाली.
वनविभागाला याची माहिती मिळताच त्यांनी शोधमोहीम हाती घेतली होती; मात्र ज्या परिसरात बिबट्या चा वावर असल्याचे प्रसारीत झाले होते; त्या परिसरात कोणत्याही प्रकारची निशाणी किंवा बिबट्याचे ठसे आढळून आले नाहीत. यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता तसे काही आढळले तर लागलीच वन परिक्षेत्र मांडवी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. तर ही बाब छोटी नसल्याने वन कर्मचारी सतर्कता ठेऊन शोध घेत असल्याचे परिक्षेत्र वनाधिकारी संदीप चौरे यांनी सांगितले आहे.
What's Your Reaction?






