विवा महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

विवा महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

विरार - विरारच्या विवा महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे नुकताच वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांसोबतच, प्राध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी देखील विविध स्पर्धांचे घेण्यात आल्या. यावेळी ३५९ स्पर्धकांनी या स्पर्धांमध्ये सहभागी होत  विविध उपक्रमांचा आनंद घेतला. 

यावेळी सुडोकू, पुस्तक परीक्षण एखादी चिट्ठी निवडत मिनिटभरासाठी त्यावर उत्स्फूर्त बोलणे, जाहिरात विश्लेषण करणे तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमुळे काही काळ प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे आणि स्पर्धेचे वातावरण पाहायला मिळाले. या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ  प्राचार्य डॉ.वि.श.अडीगल, उपप्राचार्य डॉ. प्राजक्ता परांजपे, उपप्राचार्य आणि समन्वयक डॉ. दीपा वर्मा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. 

राज्य शासनाने 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ह्या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ग्रंथालय विभागाच्या प्रमुख डॉ. नागरत्ना पलोटी, ग्रंथालय समिती, ग्रंथालयातील कर्मचारी आणि विद्यार्थी वर्गाने मेहेनत घेतली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow