घड्याळ चिन्हा संदर्भात उद्या सुनावणी

नवी दिल्ली : राष्ट्रीय काँग्रेस गटात फुटाफूट झाल्यापासून पक्षाच्या अधिकृत चिन्हावरून वाद सुरू आहेत. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाला घड्याळ चिन्ह वापरता येऊ नये यासाठी शरद पवार गटाने केलेल्या याचिकेवर उद्या २४ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पक्षाच्या दोन्ही गटांना घड्याळ चिन्हाचा वापर करता येऊ नये म्हणून ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाल्यानंतर अजित पवार गटाकडे घड्याळ चिन्ह गेले तर शरद पवार गटाने तुतारी हे चिन्ह घेतले. येत्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरता येऊन नये म्हणून तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन होत नाही असा आरोप शरद पवार गटाने केला आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार गटाला आपलं म्हणणं मांडण्याची मुभा दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत अर्ज दाखल करण्याची मुदत २९ तारखेला संपणार असून त्याआधी या याचिकेवर सुनावणी व्हावी अशी मागणी वकिलांमार्फत शरद पवार गटाने केली आहे. या बाबत सर्वोच्च न्यायालया काय निर्णय देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
What's Your Reaction?






