घोडबंदर रस्त्याचा उपमुख्यमंत्र्यांकडून अचानक पाहणी दौरा अधिकाऱ्यांची एकच तारांबळ

मिरारोड:- ठाणे-घोडबंदर रस्त्यावर असलेल्या गायमुख घाटात आज पासून पुढील दोन दिवस रस्त्याचे काम होणार आहे.जड अवजड वाहनांना पुढील दोन दिवस घोडबंदर रोड मार्गे जाण्यास पूर्णता बंदी असणार आहे.या रस्ते दुरुस्तीच्या कामाची पाहणी करण्याकरता शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरा केला.अचानक झालेल्या दौऱ्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणेची एकच तारांबळ उडाली.उत्तम दर्जाचे काम रस्त्याचे झाले पाहिजे,पुन्हा हा रस्ता खराब होता कामा नये असा सज्जड दम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिला. ठाणे-घोडबंदर रोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.या रस्त्यावर दोन्ही बाजूला दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होते याचे प्रमुख कारण म्हणजे रस्त्यावर असलेले खड्डे,खराब रस्ता.वर्षभरापूर्वीच गायमुख घाटात रस्ता दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले होते.
मात्र पावसाळ्यात पुन्हा त्या रस्त्याची अवस्था जैसे थे वैसेच पाहायला मिळाली.त्यामुळे कंत्राटदार कडून झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे घोडबंदर रोडवर अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गायमुख घाटातील रस्ता पूर्णपणे खोदून नव्याने तयार करण्यात येत आहे.या रस्त्या रुंदीकरणाला वनविभागाची देखील अडचण आहे.साठ मीटर मंजूर असून डीपीआर आणि पुढील प्रक्रिया शासन करेल तसेच वनविभागाची जागेची अडचणी दूर शासन स्तरावर केले जाईल.या रस्त्याची वारंवार दुरुस्ती झाली आहे.मात्र पावसाचे पाणी येत असल्याने रस्ता टिकत नाही.परंतु यापुढे असे होणार नाही. ठाण्यात सर्व अधिकारी,कंत्राटदार यांची बैठक घेऊन तसे निर्देश देण्यात आलेले आहेत.रस्त्याचा बेस डब्ल्यूबीएम राऊटिंग केल्यानंतर चार इंच मास्टिक,त्यावर डांबर आणि नंतरला सिमेंट काँक्रीट अशा प्रकारचे काम रस्त्याच्या होणार आहे.त्यामुळे भविष्यात हा रस्ता खराब होणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.या दरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, मिरा-भाईंदर व ठाणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?






