जुहू चौपाटीवर कुत्र्याला हाकलल्यावर युवकाचा अंगठा कापला;आरोपींना अटक

जुहू चौपाटीवर कुत्र्याला हाकलल्यावर युवकाचा अंगठा कापला;आरोपींना अटक

मुंबई, १७ फेब्रुवारी: जुहू चौपाटीवर एका युवकाला रागातून चाकूने हल्ला करून त्याचा अंगठा कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने युवकावर हल्ला केल्याचे प्रकरण भारतीय न्याय संहिता कलम १०९, ३५२ आणि शस्त्र अधिनियम ४ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे.  

या घटनेमध्ये तक्रारदार अर्जुन कैलास गिरी (२६) यांचे अंगावर आलेल्या कुत्र्याला हाकलल्याच्या रागातून एक अनोळखी व्यक्ती भडकली आणि गिरी यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपीने जवळच्या खाद्यपदार्थ टपरीवरून चाकू घेतला आणि गिरी यांच्यावर सपासप वार केले. हल्ल्यात गिरी यांचा डाव्या हाताचा अंगठा अर्धा कापला गेला.  

गिरी यांना कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची स्थिती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हल्ल्यानंतर पोलिसांनी आरोपी ओमकार मनोहर मुखिया ऊर्फ ओमकार शर्मा (२५) याला अटक केली. आरोपीने हल्ल्याचा कारण कुत्र्याला हाकलल्यावर राग आले होते, असे सांगितले आहे.  

या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. हल्ल्यात वापरलेला चाकू अद्याप सापडला नसून त्याचा शोध सुरू आहे. आरोपीविरोधात यापूर्वी एकही गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले.  

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow