डम्पिंग ग्राउंडमध्ये कचऱ्याच्या गाड्या पूर्णपणे रिकाम्या होत नाहीत

डम्पिंग ग्राउंडमध्ये कचऱ्याच्या गाड्या पूर्णपणे रिकाम्या होत नाहीत

भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील कचरा गोळा करून तो वाहून नेणाऱ्या गाड्या भाईंदर पश्चिमेकडील उत्तन येथील डम्पिंग ग्राउंडमध्ये जातात परंतु कचऱ्याच्या गाड्या पूर्णपणे रिकाम्या न करताच त्या परत जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मीरा भाईंदर शहरातून दररोज साधारणपणे ओला व सुका कचरा मिळून ५५० ते ६०० टन कचरा गोळा केला जातो. तो भाईंदर पश्चिमेकडील उत्तन येथील धावगी गावा जवळील डम्पिंग ग्राउंडमध्ये नेला जातो. महापालिकेच्या ठेकेदाराने कचरा गोळा केलेले डंपर डम्पिंग ग्राउंडमध्ये पूर्णपणे रिकामे करणे आवश्यक असते. परंतु सध्या तसे होत नसल्याची पुराव्यासह तक्रार भाजपच्या भाईंदर विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रमुख रवी व्यास यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.डंपिंग ग्राउंड मध्ये डंपरच्या फेऱ्या वाढवून महापालिकेला लुटण्याचा प्रकार कंत्राटदार आणि डंपिंग ग्राउंड मध्ये तैनात असलेल्या महानगरपालिका कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासमोर होत आहे

महापालिकेने बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे त्याची सत्यता सहजपणे पडताळता येईल असे महापालिका आयुक्तांना केलेल्या लेखी तक्रारीत नमूद केले असून रवी व्यास यांनी कंत्राटदार आणि महापालिका कर्मचारी,अधिकारी यांच्या वर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow