मीरा रोडच्या वोक्हार्ट रुग्णालयाने ५० किडणी रोपणांचा टप्पा गाठला

मीरा रोडच्या वोक्हार्ट रुग्णालयाने ५० किडणी रोपणांचा टप्पा गाठला

भाईंदर : किडणी आजारांनी त्रस्त असलेल्या ५० रुग्णांना अवयव दानाच्या माध्यमातून किडणी रोपण शस्त्रक्रिया करून मीरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयाच्या डॉक्टरांनी जीवदान मिळवून दिले आहे.

मीरा रोडच्या वोक्हार्ट रुग्णालयाचे नेफ्रॉलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. पुनीत भुवानिया  यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, अवयव दानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे आहे, दरवर्षी देशात अवयव दानाची १ लाख रुग्णांना गरज असते परंतु फक्त १५ हजार दाते अवयव दान करतात. परदेशात मात्र गरजेपेक्षा दात्यांची संख्या अधिक असते. अवयव रोपण शस्त्रक्रिया ९५ टक्के यशस्वी होत असतात.

तसेच रुग्ण व दाता निरोगी जीवन जगतात. नुकतेच रुग्णालयात दोन रक्तगट मिसमॅच असलेल्या जोडप्यांचा स्वॅप किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. अनेक रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांसाठी ही आशेची किरणे असल्याचे त्यांनी सांगितले. किडणी रोपण शस्त्रक्रिया झालेले रुग्ण डायलिसिसविना निरोगी जीवन जगतात. या शस्त्रक्रिया डॉ. पुनीत भुवानिया यांच्या नेतृत्वाखाली डॉ. जयेश धाबलिया, डॉ. प्रदीप व्यावहारे, डॉ. प्रकाश तेजवाणी आणि डॉ. आशुतोष बागेल यांच्या पथकाने केल्या

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow