डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

भाईंदर, २१ जून: मिरा-भाईंदर परिसरात डेंग्यू आणि इतर साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने महानगरपालिकेने खबरदारीचे उपाय सुरू केले असून नागरिकांनीही दक्ष राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या शहरात सुमारे ४० डेंग्यूचे रुग्ण आढळले असून प्रशासन सतर्क झाले आहे.
महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत डेंग्यू आणि मलेरिया रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. शहरातील घनदाट वस्त्यांमध्ये फॉगिंग, औषध फवारणी, पाण्याच्या साठ्यावर लक्ष ठेवणे आणि जनजागृती मोहीम राबवली जात आहे.
डेंग्यू रोखण्यासाठी पालिकेचे काही महत्त्वाचे उपायः
-
घरामधील व आसपास स्वच्छता राखणे
-
पाण्याचे साठे झाकून ठेवणे
-
आठवड्यातून एकदा पाणी रिकामे करणे
-
झाडांच्या कुंड्यांमधील पाणी साचू न देणे
-
लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या आरोग्य केंद्रात तपासणी करणे
महापालिकेच्या वतीने आरोग्य विभागाने विशेष तपासणी मोहिमा हाती घेतल्या आहेत. नागरिकांनी पालिकेशी सहकार्य करावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ.यांनी केले.
डेंग्यूचे संभाव्य लक्षणे म्हणजे ताप येणे, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, सांधेदुखी आणि त्वचेवर पुरळ येणे. ही लक्षणे दिसल्यास उपचारासाठी विलंब करू नये.
संपर्कासाठी:
महानगरपालिका हेल्पलाइन – १८००-२२२-३५०
What's Your Reaction?






