मुंबई- एका महाविद्यालयाच्या प्राचार्याने १७ वर्षीय विद्यार्थीनीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी दहिसरच्या एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील १ वर्षांपासून आरोपी मुख्याध्यापक या विद्यार्थीनीला प्रेमसंबंध ठेवण्यासाठी दबाव करत तिचा लैंगिक छळ करत होता.
एमएचबी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी ३७ वर्षीय असून एका कनिष्ठ महाविद्यालयात मुख्याध्यापक आहे. या महाविद्यालयात १७ वर्षांची पीडित विद्यार्थीनी शिक्षण घेत आहे. मागील एक वर्षांपासून हा मुख्याध्यापक तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. सतत तिच्याशी अश्लील संभाषण करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करत होता. पीडितने त्याच्याशी प्रेमसंबंध ठेवावे यासाठी तो सतत तिच्यावर दबाव टाकत होता. अखेर हा प्रकार असह्य झाल्याने तिने कुटुंबियांना हा प्रकार सांगितला. त्यांनी एमएचबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आम्ही पीडित विद्यार्थीनीचा जबाब नोंदवला आहे. याशिवाय महाविद्यालयातील अन्य विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले जातील, घटनास्थळाचे सीसीटीव्ही तपासले जातील असे एमएचबी पोलिसांनी सांगितले.
Previous
Article