गांजा (कॅनबीज) अमंली पदार्थ विक्री करणा-या टोळीला अटक

गांजा (कॅनबीज) अमंली पदार्थ विक्री करणा-या टोळीला अटक

भाईंदर पूर्वेच्या  नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६,९०,००० (सहा लाख नव्वद हजार रु. कि.चा गांजा (कॅनबीज) अमंली पदार्थ विक्री करणा-या टोळीला अमंली पदार्थासह रंगेहाथ पकडण्यात नवघर पोलिसांना यश मिळाले आहे.त्यांच्याकडे गांजा (कॅनबीज)  एकूण २३ बॉक्स व वजन ४६ किलो इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरच्या गुन्ह्यात एकूणसहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मिरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत अमंली पदार्थ विक्री व सेवन करणा-या इसमांवर कारवाई करण्या करता वरिष्ठांनी वेळोवेळी सूचना दिल्या होत्या. नवघर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अमंलदार शुक्रवारी गस्त करत असताना दुपारी १२-२० च्या सुमारास जेसल पार्क चौपाटीकडे जाणाऱ्या रेल्वे स्टेशन लगतचा रसत्या जवळ त्यांना सहा इसम हातामध्ये ०३ प्रवासी ट्राली बॅग घेऊन उभे असलेले दिसून आले.सहा जण संशयीतरीत्या उभे असताना दिसून आल्याने व काहीतरी लपवत असल्याचे पोलिसांना दिसलें.त्यांच्या जवळ गेल्यावर उग्रवास आल्याने त्याच्याकडे अमंलीपदार्थ असल्याचा पोलीसांना संशय आला.पोलिसांनी दोन पंचाना घटनास्थळी बोलावून इसमांना बॅगेसह ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणत  बॅग उघडून तपासणी केली असता त्यात गांजा (कॅनबीज) नामक अमंली पदार्थ मिळून आला.गुन्हयामध्ये आरोपी नामे प्रमोदकुमार श्यामलालसिंह कुस्वाह, बनमाली नंदिया प्रधान, कान्हा सुदर्शन परिदा, विकास हरस खुणटिया ,शिपू भास्कर स्वाईन , राजा संतोष स्वाईन अश्या सहा आरोपींना गुन्हयामध्ये अटक करण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow