नऊ जुगाऱ्यांना अटक:पत्रकारांच्या वृत्त संकलना नंतर पोलिसांना जाग

नऊ जुगाऱ्यांना अटक:पत्रकारांच्या वृत्त संकलना नंतर पोलिसांना जाग
नऊ जुगाऱ्यांना अटक:पत्रकारांच्या वृत्त संकलना नंतर पोलिसांना जाग

वसई :मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयाच्या माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हाकेच्या अंतरावर विविध गैर धंदे सुरु असून एका जुगाराच्या अड्यावर प्रसार माध्यमे वृत्त संकलना करीता 
पोहोचल्यावर आपले पितळ उघडे होऊ नये याकरिता पोलिसांनी दुसऱ्या दिवशी लुटुपुटूची धाड  घालून नऊ जणांवर कारवाई केली. 

माणिकपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आनंद नगर येथील एका शाळेलगतच्या इमारतीत दोन जुगारांचे अड्डे सुरू होते. मागील काही महिन्यांपासून बिनभोबाट सुरू असलेल्या या जुगारांमुळे परिसरातील नागरिक,शालेय विद्यार्थी, शिक्षक त्रस्त झाले होते. याची संपूर्ण कल्पना पोलीस प्रशासनाला होती. तरीही, यावर कारवाई केली जात नव्हती.  प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी याची पाहणी, वृत्त संकलन करण्यास गेले असता, त्याची खबर लागताच पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सदरची कारवाई केली. 

पोलिस अंमालदार संतोष गोरख म्हस्के यांनी दिलेल्या तक्रारीत, 
जुगार अड्डा चालक मोहमद नय्यर गुलाम मिसाळ, वय ६१ वर्षे, रा. नसीमा मंजील, नवयत मोहल्ला, जामा मस्जिद जवळ, पापडी यासह राजकुमार महादेव गुप्ता वय-४० धंदा- जॉकी, रा. नाजु मेशन, वुड हाऊस रोड, मुंबई कुलाबा, दिनेश मोहन कुमार वय-४६ , रा.भगतसिंग नगर गोरेगाव, राजकुमार कपुरचंद शर्मा वय-२५ , रा. यादव नगर, बोईसर  प्रदीप कुमार दिपक पंडीत वय-२५ , रा. भगतसिंग नगर, गोरेगाव, सुशिल शांताराम चव्हाण वय-५०  रा विश्वकर्मा ईस्टेट वसई , दीपक सूर्यकांत डमरे, वय ४३ जय माता दी बिल्डिंग, हनुमान नगर, नालासोपारा, टून कुमार भागवत प्रसाद जाधव, रा. क्रॉस रोड धारावी माहीम पुर्व मुंबई, नंदकिशोर अकलू रविदास वय ४६ तोडी वाली चाळ, सांताक्रूझ अशी अटक आरोपींची नावे आहेत. 

त्यांच्याकडून पाच हजार सातशे रुपये रोख व अन्य साधने असा एकूण २७ हजार ३४० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१/२०२५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम ४ (अ) , ५ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow