नवी मुंबई : पाणी पुरवठा देयकांच्या अभय योजनेस 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

नवी मुंबई:नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील थकीत पाणी देयक ग्राहक यांच्याकडील थकीत पाणी देयक वसूली करण्याच्या दृष्टीने थकीत पाणी देयक ग्राहकांकरिता एकूण थकीत पाणी देयकामधील विलंब शुल्क व दंडात्मक रक्कमेवर 75% सूट देणारी अभय योजना लागू करण्यात आली आहे.
सदर अभय योजनेचा अंतिम 30 सप्टेंबर हा होता. तथापि, ग्राहकांच्या मागणीनुसार या अभय योजनेस 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे नमुंमपा आयुक्त यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेले आहे. त्यानुसार माहे जून-जुलै 2024 महिन्यांतील देयक भरणा करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील थकीत पाणी देयक ग्राहक यांनी आपले जून-जुलै 2024 महिन्यांतील पाणी देयक ऑनलाईन भरण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या https://www.nmmc.gov.in या वेबसाईटचा वापर करावा.
याशिवाय जून-जुलै 2024-2025 च्या वितरीत करण्यात आलेल्या प्रत्येक पाणी देयकावर त्या त्या ग्राहकासाठी स्वतंत्र क्यू आर कोड (QR CODE) छापण्यात आला असून नागरिक पाणी देयकावर असलेला क्यू आर कोड स्कॅन करुन अगदी सहजपणे आपली पाणी देयके भरणा करु शकतात.
त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय व सर्व आठही विभाग कार्यालये तसेच बेलापूर येथील गौरव म्हात्रे कला केंद्र व नेरुळ सेक्टर-44 जलकुंभ संकुल येथील पाणी देयक भरणा केंद्रांवर देयक भरणा करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
तरी संबंधित पाणी देयक ग्राहकांनी, अभय योजनेच्या वाढीव मुदतवाढीचा लाभ घ्यावा व थकीत पाणी देयक रक्कम तात्काळ भरुन पुढील होणारी कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
What's Your Reaction?






