पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन चरित्रावर वसईत व्याख्यान

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन चरित्रावर वसईत व्याख्यान

विरार:ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे, तोच स्वकर्तुत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो अशा लोकमाता अहिल्याबाई होळकर.ज्यांनी सर्वधर्मसमभाव, अस्पृश्यता उच्चाटन, सामाजिक एकात्मता, स्त्री पुरुष समानता, गोरगरिबांना विषयी कळवळा, हुंडा पद्धतीचे उच्चाटन, अनिष्ट चालीरीती रूढी परंपरांचा बिमोड, मूल दत्तक वारसाहक्क , प्रजेविषयी तळमळ अशा कितीतरी समाजसुधारकांचे कृतिशील कार्य करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन पटावर वसईत  व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे .वसईचे सुप्रसिध्द उद्योजक स्व. शांताराम महादेव धुरी यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त धुरी परीवार व मित्रमंडळीने बुधवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता समाज उन्नति मंडळ सभागृह माणिकपूर येथे हे व्याख्यान आहे.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे  हे त्रिशताब्दी वर्ष आहे. संपादिका सौ. कविता मयेकर यांचे अहिल्याबाईंच्या कर्तृत्व- नेतृत्व व दातृत्व या विषयावर हे  व्याख्यान होणार आहे.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नवघर गावाचे जुने समाजसेवक विनायक निकम व वर्तक महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. महादेव इरकर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डॉ. सौ. लतीका पाटील करणार आहेत.

कार्यक्रमास नागरीक बंधु भगिनींनी उपस्थित रहावे अशी विनंती शेखर धुरी यांनी धुरी परिवाराचे वतीने केली आहे .
 
इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ मागरिट" असे म्हणले आहे. [१] थोडक्यात अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मागरिट यांच्याशी एकत्रित केली आहे. त्याने म्हणले आहे की ज्या वेळेस जगातील सर्वात महान स्त्रीयांचा इतिहास लिहिला जाईल त्या वेळेस पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सर्व प्रथम लिहिले जाईल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow