गुजरातची रिया सिंघा नवी 'मिस युनिव्हर्स इंडिया'

नवी दिल्ली:गुजरातच्या रिया सिंघाने 'मिस युनिव्हर्स इंडिया 2024' चा किताब जिंकला आहे. जयपूरमध्ये मिस युनिव्हर्स इंडिया या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात एकूण 51 स्पर्धक होते. या सर्व स्पर्धकांना मागे टाकत रिया सिंघाने मिस युनिव्हर्स इंडियाचे विजेतेपद जिंकले. प्रांजल प्रिया दुसऱ्या क्रमांकावर होती. तर, छवी वर्ग तिसऱ्या स्थानी होती.
अभिनेत्री उर्वशी रौतेलाने रियाला 'मिस युनिव्हर्स इंडिया'चा मुकूट घातला. मिस युनिव्हर्स इंडियाचे विजेतेपद जिंकल्यामुळे रिया आता मेक्सिकोमध्ये होणाऱ्या मिस युनिव्हर्स २०२४ मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
मी मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा ताज जिंकला असून मला फार आनंद झाला आहे. या साठी मी खूप मेहनत घेतली आहे. या आधीच्या विजेत्यांकडून मला प्रेरणा मिळाली, असे रियाने यावेळी सांगितले.
What's Your Reaction?






