पुण्याजवळील डोंगराळ भागात हेलिकॉप्टर कोसळून ३ जण ठार

पुणे :पुण्याजवळील बावधन येथे आज सकाळी टेकऑफ झाल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. हे हेलिकॉप्टर सरकारी होते की खाजगी हे माहीत नाही. हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट आणि एक अभियंता होते.
पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील पोलिसांनी सांगितले की, आज पहाटे 6.45 च्या सुमारास हेलिकॉप्टर डोंगराळ भागात कोसळले. "पुणे जिल्ह्यातील बावधन भागात एक हेलिकॉप्टर कोसळले. प्राथमिक माहितीनुसार, दोन जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे हेलिकॉप्टर कोणाचे होते हे अद्याप समजू शकलेले नाही," असे वरिष्ठ निरीक्षक कन्हैया थोरात यांनी सांगितले, अशी माहिती पीटीआयने दिली आहे.
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार हेलिकॉप्टरने ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून उड्डाण केले होते आणि परिसरात दाट धुक्यामुळे हा अपघात झाला असावा. बचावकार्य सुरू आहे.
What's Your Reaction?






