पुण्यातील मंडई मेट्रो स्टेशनला भीषण आग

पुण्यातील मंडई मेट्रो स्टेशनला भीषण आग

पुणे : महात्मा फुले मंडई परिसरातील मेट्रोस्थानकात मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळतात अग्निशामक दलाचे सहा बंब घटनास्थळी रवाना झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आग मोठ्या प्रमाणावर भडकल्याने अडचणी येत आहेत. आगी मागचे निश्चित कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशामक दलाने दिली. आगीत कोणी अडकले किंवा नाही. मध्यरात्री बाराच्या सुमारास मंडई मेट्रो स्टेशन येथे तळमजल्यावर फोमच्या साहित्याला आग लागून मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता. अग्निशमन दलाकडून तातडीने 5 वाहने रवाना करत आग पाचच मिनिटात आटोक्यात आणली. जवानांनी श्वसनरहीत अग्निशमन उपकरणाचा वापर करत पाणी मारुन आग विझवली.

जखमी कोणी नसून आग वेल्डिंगचे काम सुरु असताना लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ं या संदर्भात खासदार मुरलीधर मोहोळ यांनी देखील ट्वीट केले आहे. मुरलीधर मोहोळ म्हणाले, मंडई मेट्रो स्टेशनला आग लागल्याचा दुर्दैवी प्रकार घडला होता. आगीची बातमी समजताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पाच फायर गाड्यांच्या माध्यमातून आगीवर तातडीनं नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सदरील घटना मेट्रोचे प्रवासी कामकाज संपल्यानंतर घडली होती. मेट्रो स्टेशनच्या भागात वेल्डिंगची काम सुरू असताना हा प्रकार घडला. यासंदर्भात मेट्रोचे कार्यकारी संचालक श्रवण हर्डीकर यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली असून या घटनेचा मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे मेट्रो प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow