नालासोपारा विधानसभा मतदार संघातून राजन नाईक यांची भाजपाकडून उमेदवारी घोषित, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

नालासोपारा विधानसभा मतदार संघातून राजन नाईक यांची भाजपाकडून उमेदवारी घोषित, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

मुंबई:पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघापैकी नालासोपारा मतदारसंघातून भाजपाने नालासोपाऱ्यातील भाजपाचे नेते राजन नाईक यांची उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे या मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास उत्सुक असणाऱ्या इतर उमेदवारांची निराशा झाली आहे. तिकीट मिळाल्याने राजन नाईक यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत. त्यामुळे आता ही घोषणा झाल्यांनतर निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, पालघर जिल्ह्यातील सहाही मतदार संघापैकी नालासोपारा मतदारसंघ हा सगळ्यात आव्हानात्मक मतदार संघ मानला जातो. या जागेसाठी महायुतीचे अनेक उमेदवार इच्छुक होते. या जागेसाठी भाजपा कडून भरत राजपूत यांचे नाव सगळ्यात पुढे होते मात्र यानंतर राजन नाईक यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. यासोबतच इतर अनेक उमेदवार देखील या जागेसाठी प्रयन्त करत होते. गेल्या काही दिवसांपासून बहुजन विकास आघाडीचे कार्याध्यक्ष राजीव पाटील यांचा भाजपात प्रवेश होणार हे नक्की होते मात्र राजीव पाटील यांनी बहुजन विकास आघाडीत घरवापसी केल्याने राजन नाईक यांचा तिकीट मिळवण्याचा मार्ग सोपा होऊन भाजपाने आपल्या पहिल्या यादीतच नाईक यांच्या नावाची घोषणा केली. याबाबत बोलताना भाजपाचे वसई विरार जिल्हा प्रचार प्रमुख मनोज बारोट यांनी सांगितले की भाजपाच्या केंद्रीय आणि प्रदेश नेतृत्वाने वसई विरार प्रदेशातील कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत १३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून राजन नाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. जनतेचा भाजपावर विश्वास असून त्यांना बदल हवा आहे आणि नाईक यांच्या उमेदवारीमुळे जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पालघर लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या विजयानंतर आता विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा विजय मिळवण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक आहेत असेही ते पुढे म्हणाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow