अखेर अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे कार्यमुक्त!

अखेर अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे कार्यमुक्त!

विरार : वसई-विरार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांना पालिका सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार; उपसचिव-मंत्रालय-संवर्ग रमेश मनाळे यांची वसई-विरार महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर 2 डिसेंबर 2022 रोजी नियुक्ती करण्यात आलेली होती. तीन वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.  

त्याआधीही त्यांनी वसई-विरार महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाची जबाबदारी भूषविलेली होती. राज्य सरकारच्याच 31 जून 2018 च्या आदेशानुसार; उपसचिव-मंत्रालय-संवर्ग रमेश मनाळे यांना वसई-विरार महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर प्रतिनियुक्ती देण्यात आलेली होती. मात्र 25 जून 2020 मध्ये त्यांचा तीन वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांनी; त्यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणावी, अशी विनंती सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय यांना केली होती. त्यानुसार रमेश मनाळे यांची प्रतिनियुक्त संपुष्टात आणून त्यांच्या सेवा सनियंत्रित विभाग, सामान्य प्रशासन विभाग-मंत्रालय यांच्याकड़े प्रत्यावर्तित करण्यात आल्या होत्या.

 त्यानंतर पुन्हा वसई-विरार महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर 2 डिसेंबर 2022 रोजी त्यांना नियुक्ती करण्यात आलेली होती. हा कालावधीही संपुष्टात आल्याने त्यांनी कार्यमुक्त करण्याची विनंती केली होती. दरम्यानच्या काळात आयुक्त अनिलकुमार पवार मसुरी येथे प्रशिक्षणासाठी गेल्याने रमेश मनाळे यांच्यावर आयुक्त पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आलेली होती. त्यामुळे त्यांना कार्यमुक्तीस विलंब झालेला होता. मात्र आजअखेर पालिका सेवेतून त्यांना कार्यमुक्त करण्यात आले असून ते मूळ सेवेत रूजू होण्यास मोकळे झालेले आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow